ताबा सुटलेल्या कंटेनर चालकाचा पाच वाहनांना धडक; सुदैवाने जीवित हानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 07:10 PM2021-01-26T19:10:08+5:302021-01-26T19:14:11+5:30
Accident : अपघातामध्ये कोणासही दुखापत झालेली नाही.
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीवर उलटलेल्या टेम्पोला क्रेनद्वारे वाहतूक नियंत्रणचे पोलीस कर्मचारी बाजूला करत असताना संथगतीने वाहतूक सुरू असताना त्याच दिशेने येणाऱ्या कंटेनरने एकाच वेळी पाच मोटर वाहनास धडक दिल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले; मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा दुर्वेसचे पीएसआय कोंडे व इतर पोलीस कर्मचारी महामार्गावर मुंबईगुजरात वाहिनीवर टेम्पो क्र. एम एच.४८ए वाय ७४३७ हा पहिल्या लेनवर पलटी झाला होता.
सदरचा टेम्पो हा IRB क्रेनचे मदतीने बाजूला करत असताना महामार्गावरील वाहतूक तिसऱ्या लेनवरून संथ गतीने चालू असताना वाघोबा मंदिरासमोर त्याच दिशेने कंटेनर. क्र.एम एच ४६ एच ३४२२ यावरील चालक राकेश कुमार यादव याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याच्या पुढे असलेल्या गाडीस मागून ठोकर मारून त्यानंतर त्यापुढील इको व १२० कार, स्विप्ट कार , तवेरा गाडी यांना ठोकर मारून त्या गाड्यांचा प्रचंड नुकसान केले आहे. अपघातामध्ये कोणासही दुखापत झालेली नाही. अपघातातील वाहने IRB क्रेनचे मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मनोर पोलीस ठाण्यात मोटर अपघाताचे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.