चालकांकडून १९ लाखांचा दंड वसूल
By admin | Published: January 12, 2017 05:48 AM2017-01-12T05:48:33+5:302017-01-12T05:48:33+5:30
नियम मोडून वाहन चालवणाऱ्या हजारो चालकांकडून वर्षभरात साडे एकोणीस लाखांचा दंड वसूल करण्याची कामगिरी
वसई: नियम मोडून वाहन चालवणाऱ्या हजारो चालकांकडून वर्षभरात साडे एकोणीस लाखांचा दंड वसूल करण्याची कामगिरी चिंंचोटी महामार्ग पोलिसांनी गेल्या वर्षभरात केली आहे. गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर अधिक होत असल्याच्या तसेच नियम मोडून वाहन चालवण्याच्या घटना वाढत चालल्यामुळे या महामार्ग पोलीसांनी विरार ते दहिसर चेकनाका या आपल्या हद्दीत कडेकोट नाकाबंदी आणि तपासणी केली.त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांना १७ हजार ९२१ वाहन चालकांवर कारवाई करता आली.
या चालकांकडून १९ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरिक्षक मोहन चाळके,उपनिरिक्षक चौगुले आणि सहाय्यक उपनिरिक्षक यमगर, डुकले, हवालदार महाजन, बडेकर, घोटाळे, पवार यांचे पथक सहभागी होते.
२०१५ मध्ये याच पथकाने १८ हजार ३५८ वाहन चालकांवर कारवाई करून १८ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला होता. हे लक्षात घेता या वेळी दंडाची रक्कम वाढली आहे हे लक्षात येते. परंतु, कारवाई झालेल्या चालकांचा आकडा मात्र घटला आहे. (प्रतिनिधी)