डहाणूकरांवर पुन:भारनियमनाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:14 AM2017-10-06T01:14:15+5:302017-10-06T01:14:30+5:30
नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रि...
अनिरुध्द पाटील
बोर्डी : नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे. डहाणू उप विभागीय कार्यालयाअंतर्गत २५ फिडर असून ४५,५०० वीज ग्राहक भारनियमनाच्या विळख्यात सापडले आहेत.
उत्सव काळात भारनियमन कमी करून नागरिकांचा उद्रेक थोपविण्यात महावितरण यशस्वी ठरली होती. मात्र, त्या नंतर पुन:भारिनयमनाला प्रारंभ झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरु वात आली आहे. डहाणू उप विभागीय वीज कार्यालयाअंतर्गत ४५,००० ग्राहकसंख्या असून त्याची विभागणी २५ फिडर मध्ये झाली आहे.
त्यानुसार ए मध्ये चार फिडर सव्वातीनतास, बी तीन फिडर चारतास, सी तीन फिडर पावणेपाचतास, डी शून्य फिडर, इ तीन फिडर सव्वासहातास, एफ दोन फिडर साततास, आणि जी १ सात फिडर पावणेआठतास, जी २ एक फिडर साडेआठतास, जी ३ एक फिडर सव्वानऊतास भारनियमन प्रतिदिन करण्यात येत आहे.
कोळसा उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या वीज संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच फिडरवर भारिनयमन केले जात आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भारिनयमनाचा कालावधी असल्याने दैनंदिन व्यवहारावर त्याचा परिणाम जाणवत आहे.
घरगुती व कृषी फिडरची सरमिसळ
या तालुक्यात घरगुती आणि कृषी फिडर अशी सरमिसळ केलेली आहे. ही विभागणी वेगवेगळी केल्यास या काळात घरगुती ग्राहकांना कमी तास भारिनयमन वाट्याला येईल.संबंधित फिडर कडून वीज चोरी कमी झाली आहे. त्यांना सुधारित फिडर मध्ये समावेश करण्याची आवश्यकता आहे. शिवाय एका फिडरवरील ग्राहकांचा अतिरिक्त भार कमी केला पाहिजे. परंतु मुद्दामहून केले जात नसल्याचा आरोप नरपड गावातील वीज ग्राहक सचिन राऊत यांनी केला आहे. नेमून दिलेल्या तासा व्यतिरिक्त तांत्रिक कारणास्तव वीजेपासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
डहाणू विभागात २५ फिडर असून ए ते जी ३ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. प्रत्येक फिडरसाठी भारिनयमनाचे तास वेगवेगळे आहेत.
- भुपेंद्र धोडी,
उप कार्यकारी अभियंता, डहाणू उप विभागीय कार्यालय