रासायनिक सांडपाण्यामुळे नालासोपारा खाडी प्रदूषित, मासेमारी, शेती, मीठ उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 06:04 AM2018-04-07T06:04:04+5:302018-04-07T06:04:04+5:30

वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे.

Due to chemical sewage, pollution of Nalasopara creek, fishing, farming, salt production | रासायनिक सांडपाण्यामुळे नालासोपारा खाडी प्रदूषित, मासेमारी, शेती, मीठ उत्पादनावर परिणाम

रासायनिक सांडपाण्यामुळे नालासोपारा खाडी प्रदूषित, मासेमारी, शेती, मीठ उत्पादनावर परिणाम

Next

- शशी करपे
वसई - वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडले जात असल्याने नालासोपारा खाडी प्रदुषित झाली आहे. त्यामुळे यापरिसरातील भूमीपूत्रांच्या पारंपारिक शेती, बागायती, मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
वसईत वालीव, गोखीवरे, नवघर, सातीवली, चिंचपाडा या परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर रासायिनक कारखाने आहेत. या कारखान्यातील रासायिनक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नालासोपारा खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी काळे व फेसाळलेले असून विषारी बनले असून त्यावर तवंग जमा झाले आहे. नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. खाडीतील मासे प्रदुषणामुळे मरू लागले आहेत. त्यांच्या प्रजनानावर परिणाम होऊन मासे कमी झाले आहेत. विषारी पाण्यामुळे खाडीलगतच्या भातशेती व बागायतीवर परिणाम झाला आहे. तसाच परिणाम मीठ उत्पादनावरही होऊ लागला आहे. त्यामुळे उपजिवीकेचे साधन नष्ट होत असल्याने भूमीपूत्र चिंतेत असल्याची तक्रार जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी वसई विरार महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

प्रदूषणामुळे भूमिपुत्रांचा रोजगार संकटात

महापालिकेने स्वच्छता अभियानात भाग घेऊन शहर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यात नालासोपारा खाडी स्वच्छता मोहिम हाती घेतली नाही. रासायनिक अत्याचारामुळे आरोग्य व पर्यावरणालाही हानी होत आहे.

नालासोपारा खाडीलगत असलेले गावकरी या पाण्यावर शेती, मासेमारी व मीठ उत्पादन करतात. पण, खाडीतील पाणी प्रदुषित झाल्याने भूमीपूत्रांच्या पारंपारिक मासेमारी व मीठ उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.

Web Title: Due to chemical sewage, pollution of Nalasopara creek, fishing, farming, salt production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.