सततच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचा बेमुदत बंद

By admin | Published: October 24, 2015 11:18 PM2015-10-24T23:18:07+5:302015-10-24T23:18:07+5:30

गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर

Due to continuous action, unstoppable sand commercials | सततच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचा बेमुदत बंद

सततच्या कारवाईमुळे रेती व्यावसायिकांचा बेमुदत बंद

Next

वसई : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती व्यावसायिकांनी सतत होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला आहे. रेती वाहतुकीचे परवाने ज्यांच्याकडे नाहीत, अशांवर महसूल विभागातर्फे दंड आकारण्यात येत असल्यामुळे या व्यावसायिकांनी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.
बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट असतानाच रेतीचा पुरवठा बंद झाल्यामुळे वसई, विरार, ठाणे, पालघर परिसरातील बांधकाम व्यवसाय पूर्णपणे कोसळण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने वसई, पालघर, भिवंडी भागात होणाऱ्या रेती उत्खनन व्यवसायावर निर्बंध टाकले आहेत. त्यामुळे गेली ४ वर्षे रेती व्यवसाय मंदीच्या सावटाखाली आहे.
दरम्यान, महसूल विभागाने अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची पथके निर्माण केली आहेत. दिवसा महसूल व पोलीस अधिकारी यांचा ससेमिरा मागे लागतो म्हणून व्यावसायिक रात्रीच्या वेळी रेतीची वाहतूक करीत असतात.
सदर बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेतीस्थळ परिसर व मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पथके तैनात केली. गेल्या ३ महिन्यांत महसूल विभागाने रेतीस्थळावर साचलेला रेतीचा साठा व अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला आहे. त्यामुळे रेती व्यावसायिकांनी आता बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. बंदच्या दबाव अस्त्रामुळे महसूल प्रशासनावर काय परिणाम होतो हे पहाणे औत्सूक्याचे ठरेल. (प्रतिनिधी)

Web Title: Due to continuous action, unstoppable sand commercials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.