भ्रष्ट कारभारामुळे वाडा पोलीस ठाणे झाले बदनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:45 AM2018-01-13T04:45:42+5:302018-01-13T04:45:52+5:30

पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांनी चिंचघर येथील एका तरूणाला खोट्या गुन्ह्यÞात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी करून त्याचा छळ केला. त्याला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Due to corrupt practices, the Badasa police station became defamed | भ्रष्ट कारभारामुळे वाडा पोलीस ठाणे झाले बदनाम

भ्रष्ट कारभारामुळे वाडा पोलीस ठाणे झाले बदनाम

Next

- वसंत भोईर

वाडा : पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांनी चिंचघर येथील एका तरूणाला खोट्या गुन्ह्यÞात अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून पैशांची मागणी करून त्याचा छळ केला. त्याला कंटाळून त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे पोलिसांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाडा पोलीस ठाणे हे गेल्या दोन तीन वर्षात कुप्रसिद्ध झाले असून येथे चंदनाची तस्करी करणारे दोन कंटेनर (ट्रक) पोलिसांनी जप्त केले होते. त्यानंतर एक ट्रक दारूचासाठा पकडला गेला होता. परळी पोलीस दूरक्षेत्रात तक्र ारदाराकडून एका पोलीस हवालदाराला तर सुप्रीम कंपनीच्या धनादेश वटविण्याच्या प्रकरणात येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आवटे यांना लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. अमली पदार्थाचा सुमारे १२ कोटीहून अधिक किंमतीच्या साठा गुजरात एटीएसच्या पोलिसांनी पकडला होता. अलिकडेच कुडूस येथे भर नाक्यावर कंपनीच्या एका व्यवस्थापकावर गोळीबार करून त्याच्याकडून सहा लाखांची रोकड चोरट्यÞांनी लंपास केली होती. त्या चोरट्यांना ठाणे गुन्हा शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. तर आत्महत्या, खुनाचा प्रयत्न, खुन असे अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत. असे असतानाच तालुक्यातील चिंचघर येथील तरूण कृपाल पाटील यांचे एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण होते. या प्रेमप्रकरणात वादावादी झाल्यानंतर त्या मुलीने कुडूस पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहूराज रणवारे यांच्याकडे तोंडी तक्र ार केली. रणवारे यांनी या प्रकरणी त्याला २२ डिसेंबर २०१७ रोजी दोन लाखांची लाच मागितली. तसेच पैसे दिले नाहीत तर गुन्हे नोंदवण्याची धमकीही दिली. कृपाल याने २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत दोन टप्प्यात एक लाख दिले. त्यानंतरही रणवारेने त्रास दिल्याने या तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुसाईट नोट मध्ये त्याने झालेल्या अन्यायाची कथाच लिहील्याने सगळा भांडा फुटला. या नोटची दखल घेत पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी रणवारे यांना निलंबित केले आहे. रणवारे तानसा फॉर्मवरील ४२ बंगल्यावरील वारंवार पाट्या झोडत असल्याची चर्चा आहे. कुडूस नाक्यावरील काही टपºया वाल्यांकडून ७०० रुपये महिन्याला घेत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरूआहे. अनेकांचा गुन्ह्यात संबंध नसतानाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याची चर्चा रंगत आहे. भंगारवाल्यांकडूनही दरमहा हप्ता, कुडूस वाडा मार्गावरील धाब्यांवर होणाºया दारूविक्र ीला अभय अशा अनेक गोष्टी आता उघड होत आहे. या हप्ते खोरी विरोधात वाड्यातील संघटना एकवटणार आहेत.

Web Title: Due to corrupt practices, the Badasa police station became defamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.