माकपच्या बालेकिल्ल्याने दिली कमळाला पसंती, डहाणू विधानसभेचा रागरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:02 AM2018-06-04T03:02:01+5:302018-06-04T03:02:01+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचारात कंबर कसली असली तरी डहाणू विधानसभेच्या निकालानंतर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.

 Due to the CPI (M) 's cage, the lotus will be preferred, Dahanu ragarges for the Assembly | माकपच्या बालेकिल्ल्याने दिली कमळाला पसंती, डहाणू विधानसभेचा रागरंग

माकपच्या बालेकिल्ल्याने दिली कमळाला पसंती, डहाणू विधानसभेचा रागरंग

Next

- शौकत शेख

डहाणू : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचारात कंबर कसली असली तरी डहाणू विधानसभेच्या निकालानंतर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डहाणू विधानसभा मतदार संघात ५८.९८ टक्के मतदान झाले. डहाणू विधानसभेत एकुण मतदान १,४९,२११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना ४९,१८१ येवढी सर्वाधिक मते मिळाली असून डहाणू विधानसभेत भाजपा अव्वल स्थानी आला आहे.
विशेष म्हणजे माकपचा बालेकिल्ला असलेल्या डहाणू तलासरीतून किरण गहला यांना ४२,५१७ मते मिळवत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा यांना डहाणू, तलासरीतुन ३८,७७८, मते मिळाली आहेत. त्यामुळे डहाणूत शिवसनेला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले, काँग्रेसचे दामु शिंगडा यांना ५९५५ मते मिळवत चौथ्या स्थानावर तर बविआचे बळीराम सुकुर जाधव यांना ५४८४ मते मिळवत पाचव्या स्थानावर मजल मारली. त्या खालोखाल नोटा ला ४४६१ मते मिळाली आहेत. संदीप रमेश जाधव अपक्ष यांना १७२९ मते तर शंकर भागा बधाटे (मार्कसवादी लेनीनवादी) यांना ११०६ मते मिळाली.
डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपचे स्थानिक आमदार
पास्कल धनारे हे निवडून आले आहेत. त्यांना २०१४ मध्ये ४४,८४९ मते मिळाली होती. मात्र,
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मतात ४३३२ मतांनी वाढ झाली आहे.

धनारे यांचे कौशल्य अन राजपूत यांचे टीमवर्क
कासा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सभा घेतली तरी फारसा फरक पडलेला दिसत नव्हता. डहाणू विधानसभेची आमदार पास्कल धनारे यांचे कौशल्य, आमदार मनिषा चौधरी, नगराध्यक्ष भरत राजपुत यांचे टीमवर्कमुळे भाजपला फायदा झालेला दिसून येत आहे.

पिछाडी तरी माकपचा दबदबा कायम
डहाणू तलासरी हा माकपचा गड मानला जातो. माकपला डहाणु विधानसभेतुन ४२५१७ मते मिळवत दुसरा क्र मांकावर पोचत माकपचा गड कायम ठेवला आहे. लाँग मार्चचा फायदा होईल असा अंदाज होता.२०१४ मध्ये २८१४९ मते मिळाली होती. मात्र यावेळी १४ हजार ३६८ मते वाढली आहेत.

शिवसेना सातवरून
३० हजारांवर
डहाणू विधानसभेत शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले तरी श्रीनिवास वनगा यांना डहाणू विधानसभेतून मोठ्या प्रमाणात मतदान झाले. २०१४ मध्ये शिवसेनेला ७८४७ मते मिळाली होती. मात्र, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनवच्या मतांमध्ये ३०९८१ मतांनी भरघोस वाढ झाली आहे.

Web Title:  Due to the CPI (M) 's cage, the lotus will be preferred, Dahanu ragarges for the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.