भातपिकाला हमीभाव देण्याची मागणी, बाजारपेठेअभावी शेतक-यांना चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:17 AM2017-10-28T03:17:48+5:302017-10-28T03:17:51+5:30
विक्रमगड : नैसर्गिक प्रतिकूलतेशी झगडून या जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकविलेल्या भाताला हमी भाव द्यावा व खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
राहुल वाडेकर
विक्रमगड : नैसर्गिक प्रतिकूलतेशी झगडून या जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकविलेल्या भाताला हमी भाव द्यावा व खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
तालुक्यातील ९५ गाव-पाडयातील ७८५८ हेक्टर क्षेत्रावर मोठया प्रमाणात भातशेती केली जाते़ विक्रमगड तालुका गावठी तांदळाच्या वाणाकरीता प्रसिद्ध असून भात हेच येथील आदिवासी शेतक-यांचे मुख्य उपजिवीकेचे साधन आहे़ मात्र यंदा पाऊस लांबल्याने व ऐन कापणीच्या काळात परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झालेले आहे़ मात्र आता जे भात शेतामध्ये आहे, ते कापणी करुन बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे़ परंतु विक्रमगड येथे भातपिक खरेदीकरीता मोठी व योग्य अशी बाजारपेठ नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. त्यातच शासनाने अजूनही भातखरेदी केंद्रे सुरु केली नाहीत, त्यामुळे उत्पादीत भातपिकाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़
राज्यात होणाºया शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असले तरी शेतकºयांनी काबाड कष्ट करुन शेतात पिकविलेल्या भातपिकाला योग्य हमीभाव न मिळाल्याने व वारंवार येणाºया नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने ते आत्महत्या करीत आहेत. आज महागाई एवढी वाढली आहे की, त्यामध्ये शेतीकरणे दिवसेंदिवस मोठे जिकरीचे होत आहे व त्यात उत्पादीत माल विक्री करुन काही मिळत नसेल तर तो शेतकरी काय करणार असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे़
महागडया वेगवेगळया भात वाणांची हळवार, गरवार व निम गरवा अशा पध्दतीने शेतकरी लागवड करीत असून अवेळी पडणारा पाऊस, वाढती मजुरी, खतांची बियाणांची भाववाढ पिकांवर पडणारे रोग, नैसर्गिक आपत्ती या सगळया अडचणीतून हाती आलेले पिक विकून शेतकरी आपले जीवन जगतात़ परंतु आता उत्पादित भातपिकाला योग्य हमी भाव मिळण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ शेतकºयांवर येवून ठेपली आहे़
विक्रमगड तालुक्यात जया, रत्ना, सुवर्णा, कोलम, मसुरी अशा वेगवेगळया अनेक सुधारीत जातीच्या भाताची पिके मोठया प्रमाणात घेतली जात आहेत. या पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकºयांपुढे आत्महत्या करण्याशिवाय अन्य पर्यायच उरणार नाही. अशी भावना जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भातशेतीचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन क्षमता कमी शिवाय शासनाचे भातपिक शेतकºयांकडे असलेले दुर्लक्ष यामुळे भातशेती परवडत नाही़ भातपिक तयार होऊन विक्रीस आणले जात आहे, परंतु अदयापही खरेदी केंद्रे सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत़ शेतक-यांना पडेल भावात भातपिकाची विक्री करावे लागते़ दिवसेंदिवस शेती व्यवसाय संकटाला सामोरे जात असल्याने तरुणवर्ग देखील या व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत आहे़ हीच स्थिती कायम राहिली तर या जिल्ह्यातील शेतकºयांची तरुण पिढी शेतीकडे पूर्णपणे पाठ फिरवेल व या सुपीक जमिनी मातीमोलाने बिल्डर अथवा धनदांडग्यांच्या हाती गेल्या शिवाय राहणार नाही. अशी शक्यता स्थानिक शेतकºयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
>शेतकरी हवालदिल : दोन-चार वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे़ भातशेतीवर शेतकºयांनी अफाट खर्च करुन भातपिक तयार केले आहे त्यालाही हमी भाव नाही त्यात वाढती मजुरी, खत-बी-बीयाणे यांची वाढती किंमत शेती साहित्यामध्ये सततची होणारी भाववाढ या सगळयाबाबींची पूर्तता शेतकºयांनी कर्ज काढून केली आहे़ भात विकून त्याची परतफेड त्यांना करावयाची आहे़ ती होणार कशी? हा प्रश्न आहे.
>निसर्गाचा लहरीपणा, वाढती महागाई, पिकांवर पडणारे रोग त्यामुळे शेती पिकवणे कष्टाचे झाले असून केलेला खर्चही वसूल होत नाही़ त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत चाललेला आहे़ त्यामुळे उत्पादीत मालाला योग्य हमी भाव व योग्य अशी बाजारपेठ असणे आवश्यक आहे़ ती नसल्याने शासनाने शेतक-यांच्या मालाच्या खरेदीकरीता भात खरेदी केंद्रे सुरू करुन त्यांना दिलासा द्यावा़ -शिवा सांबरे, तालुका अध्यक्ष, राष्टÑवादी