यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

By Admin | Published: October 31, 2015 10:30 PM2015-10-31T22:30:57+5:302015-10-31T22:30:57+5:30

गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम

Due to the drought this Diwali this year | यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट

googlenewsNext

- दिपक मोहिते,  वसई
गणेशोत्सव व नवरात्र सण नुकतेच पार पडले. आता प्रतिक्षा आहे दिपावलीची. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिपावली येत असून शहरी व ग्रामीण भागात दिवाळीची आतापासूनच धामधुम सुरू झाली आहे. परंतु यंदा दिपावलीवरही मंदीचे सावट आहे. तर ग्रामीण भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे भातपीकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे बळीराजामध्येही फारसा उत्साह नाही. गेला महिनाभर या उपप्रदेशातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे बागायती क्षेत्रावरही चांगलाच परिणाम जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.
वसई विरार उपप्रदेशाच्या ग्रामीण भागात यंदा दसरा, नवरात्री साजरा करण्यासंदर्भात उत्साह नव्हता. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी, त्याचा शेतीवर परिणाम व निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत गेले. पूर्वी वसईचा तांदुळ सर्वदूर विक्रीसाठी जात असे परंतु आता वर्षभर पुरेल इतकाच भात बळीराजाच्या हाती लागतो. शहरी भागामध्ये महागाईने उच्चांक गाठल्यामुळे सण साजरे कसे करायचे असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. कांदे व तुरडाळीने नागरीकांना अक्षरश: रडवले आहे. ऐन दिपावलीच्या तोंडावर तुरडाळ व मुगाच्या डाळीने भाववाढीचा उच्चांक नोंदला आहे. कांदे आजही ५० ते ६० रू. किलो दराने विकले जातात तर यंदाच्या दिपावलीमध्ये मुगाच्या डाळीच्या चकल्या पहावयास मिळणार नाहीत अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यापासून वसई विरार उपप्रदेशातील हवामानात प्रचंड फरक पडला असू त्याचा परिणाम कृषीक्षेत्रावर जाणवू लागला आहे. येथील ऋतुचक्र वारंवार का बदलले जाते याचा शोध घेण्याची गरज आहे.

यंदा निसर्गाची साथ बळीराजाला न मिळाल्यामुळे पुढील वर्षी ग्रामीण भागातील अनेक शेतकरी भात लागवडीऐवजी अन्य पीके घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. एकेकाळी पारंपारीक पद्धतीने आपले सण साजरा करणारा आदिवासी समाजही निसर्गाच्या लहरीपणामुळे उदास आहे. केवळ शेठजींच्या वाडीवर रोजगार मिळवून आदिवासी भूमीपुत्र आपले सण कसेबसे साजरे करीत आहेत.

Web Title: Due to the drought this Diwali this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.