भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 04:07 AM2019-03-18T04:07:51+5:302019-03-18T04:08:11+5:30

तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत.

 Due to the earthquake, new potholes on potholes, poultry and Dahanu | भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट

भूकंपानंतर धोका दगडखाणींचा, तलासरी, डहाणूवर नवे संकट

Next

- सुरेश काटे

तलासरी  - तलासरी डहाणू परिसराला गत काही महिन्यांपासून भूकंपाचे हादरे बसत असल्याने लोक जीव मुठीत घेऊन दिवस कंठत असताना येथे दगड खाणीतील स्फोटानेही दणके बसत आहेत. भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांच्या हात मिळवणीने हा अनधिकृत धंदा तेजीमध्ये असून भूकंपाने तडे गेलेल्या धोकादायक इमारतींनी दगडखाणीतील जिलिटीन व डायनामाईटच्या स्फोटाचा धोका निर्माण झाला आहे.
तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वैध बरोबर अवैध दगडखाणी आहेत. त्यांना महसूल विभागाने उत्खननची परवानगी दिली असली तरी उत्खनन करताना स्फोटकाने दगड काढण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र, शासनाची नियमावली भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे दुर्लक्षित केली जात आहे. त्यातच रात्रंदिवस कधीही हे दणके बसत असल्याने परिसरातील इमारती व घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच, विहिरींची पाण्याची पातळी खोलवर जात आहे. या स्फोटा विरोधात अनेक तक्र ारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत परंतु आर्थिक हित संबंधामुळे महसूल विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे.
या दगडखाणींचे प्रमाण दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशाला लागून असलेल्या तालुक्यातील उधवा गावात मोठ्या प्रमाणात आहेत. दादरा-नगर हवेली या भागात दगड खडीला मोठी मागणी असल्याने त्यांची मागणी पुरविण्यासाठी उधव्यातील दगडखाणी दिवस रात्र स्फोटकाचा वापर करून उत्खनन करीत असतात. मात्र, नागरिकांचा जीव धोक्यात असताना कागदी घोडे हलवणारे महसूल अधिकारी ढिम्म असतात.
विशेष म्हणजे तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रारीचा पाढा वाचला जात असतानाही कारवाई होत नसल्याने इमारती कोसळण्याची वाट पाहत आहात का? असा सवाल विचारला जात आहे.
दगडखाणी त स्फोट करण्यासाठी राजस्थान मधील आठ टॅक्टर तलासरीत कार्यरत आहेत. ते तालुक्यात स्फोटक पदार्थ घेऊन विस्फोटाची कार्यवाही करीत असतात. उधाव्यातील दगडखाणी मधुन स्फोटकाने उडालेले दगड जवळच्या कलमदेवी आश्रम शाळेजवळ जाऊन पडत असल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या विरोधात कलमदेवी ग्रामपंचायतीने या दगडखाणींवर कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायती चा ठराव घेऊन तो डहाणू प्रांत कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र, प्रांत कार्यालयानेही त्याची दखल घेतलेली नाही.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे हे राज्यस्थानातील स्फोट करणारे स्थानिकांना नदी व धरणातील मासे पकडण्यासाठी जिलेटिनच्या काड्या खुले आम विकतात. त्याने स्थानिक नदीत व धरणात स्फोट करून मासे पकडत आहेत. परंतु, त्यामुळे धरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

जिलेटिनच्या कांड्या मिळतात रस्त्यावर

राजस्थानातुन येणाºया स्फोटकाचे वितरण विनापरवाना स्थानिकांना सहज होत असल्याने एखाद्या मोठ्या घातपाताला आमंत्रण मिळत आहे. या विरोधात तक्रारी होऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

तलासरी मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असल्याने अशी जीवघेणी स्फोटके रस्त्यावर विकली जाणे धोक्याचे ठरत आहे. स्थानिक तरुण त्याचा वापर मासेमारीसाठी करीत असल्याचे उघड होत आहे.

या भागातील दगडखाणी निर्देशां पेक्षा खूप खोल खोदत असून स्फोटाने घरांना तडे जात आहेत
- रणजित कोम,
मा.सरपंच, कुरझे ग्रामपंचायत

उधव्यातील खदानीतील स्फोटा बाबत अनेक तक्र ारी केल्या आहेत. परंतु, महसूल विभाग कोणतीच कारवाई करीत नाही कुणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?
- भानुदास भोये, माजी उप सभापती तथा सदस्य तलासरी पंचायत समिती

Web Title:  Due to the earthquake, new potholes on potholes, poultry and Dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.