पूरस्थिती उदभवल्याने नागरिकांचे पुन्हा हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:11 PM2019-08-04T23:11:05+5:302019-08-04T23:11:17+5:30

वस्तू भिजल्याने रहिवाशांवर उपाशी राहण्याची वेळ

Due to the emergence of floods, the situation of the citizens again | पूरस्थिती उदभवल्याने नागरिकांचे पुन्हा हाल

पूरस्थिती उदभवल्याने नागरिकांचे पुन्हा हाल

Next

विरार : गेल्याच महिन्यात पूरिस्थती निर्माण झाली असताना नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानाची अद्यापही भरपाई मिळालेली नसताना पुन्हा घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.

२३ जुलैला अतिवृष्टी होऊन वसई- विरार शहरात पूरिस्थती निर्माण झाली होती व नागरिकांचे हाल झाले होते. रविवारी पहाटे पाच वाजता घरांमध्ये पाणी भरण्यास सुरूवात झाली. चाणक्य चौक, विराटनगर, तुळींज, अचोले, एव्हरशाइन सारख्या परिसरात असलेल्या सखल भागातील इमारतींमध्ये पाणी शिरू लागले. बऱ्याच नागरिकांना राहण्यासाठी आसरा नसल्याने पाणी भरलेले असतानाही नागरिक आपल्या कुंटुंबासोबत घरात बसून होते. बºयाच परिसरात पलिका, अग्निशमन दल व इतर खासगी संस्थांचा मदतीचा हात न पोहचल्याने नागरिकांना उपाशी रहावे लागले. घरात पाणी असल्यामुळे नागरिकांना जेवण बनवण्याची सुद्धा सोय नव्हती. त्यांच्यावर उपाशी राहून दिवस काढण्याची वेळ आली. मीटर बॉक्सला पाणी लागत असल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. लोकांचे फार हाल झाले.

लाटांच्या भडिमाराने किनाºयाची झीज
डहाणू/बोर्डी : पावसामुळे समुद्राला लाटांचा तडाखा बसून त्याच्या भडिमाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लाटांनी किनाºयाची प्रचंड धूप होऊन झाडे उन्मळून गेली आहेत. चौपट्यांचेही नुकसान झाले आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ५.७१ मीटरच्या लाटा किनाºयावर आदळल्या त्यामुळे चिंचणीपासून ते झाईपर्यंतच्या सुमारे ३५ किमी लांबीच्या किनाºयाची धूप होऊन माती वाहून गेल्याने सुरूची अनेक झाडे उन्मळून गेली. सलग चार दिवस भरतीच्या पाण्याचा शिरकाव होऊन घरांचे नुकसान झाले. येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बार्डीतील प्रसिद्ध चौपट्यांना लाटांचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. चिखले गावात रिठी किनारी भरतीचे पाणी डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गापर्यंत पोहचले. लाटांमुळे किनाºयावर कचरा जमा झाला असून पाऊस आणि दमट वातावरणामुळे दुर्गंधी आणि रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वालीव पोलिसांनी तिघांना वाचवले
नालासोपारा : मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून शनिवारी सायंकाळच्या सुमारास वसई फाटा येथे असलेल्या नाल्याने पावसाच्या पाण्यामुळे रौद्ररूप धारण करून वाहत होता. पाण्याच्या जास्त प्रवाहाच्या नाल्यातून मालाचा ट्रक नेताना वाहून जात होता. पण वालीव पोलिसांनी माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचून चालकासह तिघांचा जीव पोलिसांनी वाचवला. वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड येथे असलेल्या कंपनीमधून प्लास्टिकचा मुद्देमाल घेऊन मध्य प्रदेश येथील कंपनीमध्ये माल नेण्यासाठी ट्रक शनिवारी संध्याकाळी आला होता. ट्रक मध्ये २० टन प्लास्टिकचे दाणे होते. नाल्यावरून ट्रक घेऊन तिघे जण निघाले पण पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ट्रक वाहून जात होता, पण मालाचा लोड असल्याने तो अडकला. वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला बोलवले. ट्रकमधील तिघांना वाचवण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर हायड्रो मशीनच्या मदतीने ट्रकचालक जाफर मोहम्मद, इम्रान सलीम शहा आणि बाळू माहिरा या तिघांचे प्राण वाचवले.

नद्यांना आला पूर
वाडा : तालुक्यातील वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे व गारगावी या पाचही नद्यांना महापूर आला आहे. या महापूराचे पाणी गावात शिरल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. मलवाडा येथील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली. वैतरणा नदीच्या पुराचा तडखा अनेक गावांना बसला असून वाडा पूर्व विभागातील अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. कंळभे, निशेत, जोशीपाडा, दादरे, शेले, सोनाळे, बिलघर, मोज आदी गावात पुराचे पाणी शिरले आहे. तानसा नदीलाही महापूर आला असून अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. निंबवली येथील आरोग्य केंद्रात पाणी गेल्याने औषधे वाचवण्यासाठी येथील आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

तानसा नदीला महापूर
पारोळ : तानसा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावात पुराचे पाणी आले आहे. तर अंबाडी- शिरसाड मार्ग पाण्याखाली गेल्याने या भागातील वाहतूक बंद होत शहराचा ग्रामीण भागाशी संपर्कतुटला आहे., तर पारोळ येथे रविवारी सकाळी पुराचा अंदाज न आल्याने वाहन पुरात वाहून गेले असून चालकाचा मृत्यू झाला. चालकाचे नाव समजले नसून तो भिवंडी येथे टेम्पो घेऊन जात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Due to the emergence of floods, the situation of the citizens again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस