वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:51 AM2019-08-04T07:51:49+5:302019-08-04T07:53:08+5:30

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे.

Due to Heavy rain Vasai Mahapur Ambadi Shirsad Road under water, many villages under water | वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

googlenewsNext

पारोळ - वसई तालुक्यात दोन दिवसापासून पडणारा पाऊस, समुद्राची भरती, व तानसा धरणाचे पाणी या मुळे वसई पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली असून तानसा नदीच्या काठावरील पारोळ, शिरवली, सायवन, उसगाव, चांदीप,घाटेघर, कोपर, नवसई, भाताणे, खानीवडे, खारट तारा, मांडवी, या गावात पुराचे पाणी आले असून, घरात पाणी जाऊन या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शिरसाड अंबाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा वसई, विरार, नालासोपारा शहराशी संपर्क तुटला आहे

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे. पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावल्याने दिवसभर वसईत धुमशान सुरू होते. दरम्यान, वसईतील नवघर- माणिकपूर शहरातील बहुतेक सखल भागासह रस्त्यावरही पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजही वसईत पावसाचा जोर कायम आहे. 

या पावसाचा फटका येथील वाहतुकीवर व वाहनचालकांना बसला. त्यातच शहरातील मुख्य चौक भागातील सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने येथील कोंडीत अधिकच भर पडली. किंबहुना रस्त्यावर खड्डे व त्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसात वसईत सरासरी १५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा वसई बुडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यात विजेचा खेळखंडोबा अधूनमधून सुरूच होता. जून-जुलै महिन्यात वसईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांतीही घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले आहे.

वसई-विरारमधील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अनेक इमारतींच्या आवारामध्ये पाणी साचले होते. वसई पश्चिमेकडील माणिकपूर, पार्वती क्रॉस, चुळणे गाव, उमेळमान, कौल सीटी, साईनगर, डीजी नगर, समतानगर, वसई पूर्व, गोखीवरे, वालीव, औद्योगिक पट्टा, मिठागरे वसाहत, ग्रामीण व पश्चिम पट्टीतही बºयापैकी पाणी भरले होते. नवघर माणिकपूरमध्येही तळमजल्यावरील घरे, दुकानात पाणी शिरले होते.

Web Title: Due to Heavy rain Vasai Mahapur Ambadi Shirsad Road under water, many villages under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.