दिव्यांअभावी मुख्य रस्त्यावर अंधार

By Admin | Published: January 22, 2017 02:56 AM2017-01-22T02:56:01+5:302017-01-22T02:56:01+5:30

येथील रेल्वे स्थानक ते चित्रालय या मुख्य व चोवीस तास प्रचंड रहदारीच्या रस्त्यावरील तीन वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य आहे. एका कोसळलेल्या खांबामुळे पाच खांबांवरील वीज खंडित

Due to lack of lamps in the main street in the dark | दिव्यांअभावी मुख्य रस्त्यावर अंधार

दिव्यांअभावी मुख्य रस्त्यावर अंधार

googlenewsNext

- पंकज राऊत,  बोईसर

येथील रेल्वे स्थानक ते चित्रालय या मुख्य व चोवीस तास प्रचंड रहदारीच्या रस्त्यावरील तीन वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य आहे. एका कोसळलेल्या खांबामुळे पाच खांबांवरील वीज खंडित झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन ठेचकाळत चालावे लागत आहे.
विजयनगर समोर खांब कोसळल्याने हार्मोनी कॉम्प्लेक्स पासून विजयनगरपर्यंत पथदिवे बंद असून ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आणि पाठपुराव्याअभावी खांब बदलण्याचा प्रस्ताव पालघर येथील कार्यालयात मागील २९ महिन्यांपासून धूळ खात पडला आहे . या संदर्भात १४ आॅगस्ट २०१४ ला बोईसर ग्रामपंचायतीने बोईसर महावितरणच्या कार्यालयाला पत्राद्वारे कोसळलेला खांब बदलण्यासंदर्भात कळविल्या नंतर तसा प्रस्ताव बोईसरच्या कनिष्ठ अभियंत्यांनी ५ सप्टेंबर २०१४ रोजी पालघरच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मंजुरीकरीता पाठविला. मात्र ग्रामपंचायत व वीज वितरणच्या बोईसर कार्यलयाच्या पाठपुराव्याअभावी कोसळलेला खांब रस्त्यावर जैसे थे धोकादायक स्थितीत पडून आहे. ग्रामपंचायत अणि महावितरणतर्फे कागदी घोडे नावविले गेले. लोकमतनेही कोसळलेल्या खांबाचे वृत्त प्रसिद्ध करु न ही बाब निदर्शनास आणली होती. मात्र त्या नंतरही ग्रामपंचायतीसह कुठल्याही लोकप्रतिनिधि किंवा राजकीय पक्षाचे पुढारी तसेच पदाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्या मुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या हजारो नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)

महावितरणने खांब उभारूंन वीजपुरवठा सुरु केल्यानंतर त्वरीत पथदिवे लावण्यात येतील. - कमलेश संखे, ग्राम विकास अधिकारी, बोईसर ग्रा.पं.


प्रस्ताव मंजूर होताच खांब उभारूंन वीपुरवठा सुरळीत करण्यांत येईल
- विलास पाटील, कनिष्ठ अभियंता, महावितरण कंपनी बोईसर सेक्शन)

 

Web Title: Due to lack of lamps in the main street in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.