लोडशेडिंगमुळे पंप बंद, पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:24 AM2017-09-18T03:24:38+5:302017-09-18T03:24:41+5:30

कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पालघर महावितरण विभागाच्या तीन उपविभागातून गत रविवार पासून ५ ते १३ तासा पर्यंत भारिनयमन (लोड शेडिग) सुरू करण्यात आले आहे.

Due to load-shedding, the pump is closed, the crops begin to grow | लोडशेडिंगमुळे पंप बंद, पिके करपू लागली

लोडशेडिंगमुळे पंप बंद, पिके करपू लागली

Next

हितेन नाईक ।
पालघर: कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पालघर महावितरण विभागाच्या तीन उपविभागातून गत रविवार पासून ५ ते १३ तासा पर्यंत भारिनयमन (लोड शेडिग) सुरू करण्यात आले आहे. पावसाने दडी मारल्याने शेती-बागायतींना पाण्याची आवश्यकता असताना कृषी क्षेत्र असलेल्या भागातच मोठे भारमान लादल्याने शेती पंप बंद पडून पाण्या अभावी पीक करपू लागली आहेत तसेच औद्योगिक क्षेत्रावर ही मोठा विपरीत परिणाम जाणवू लागला आहे.
वीजनिर्मिती केंद्रांना कोळश्याची उपलब्धता व पुरावठ्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की राज्य शासनावर आली आहे. वीजनिर्मिती कंपन्या सोबत झालेल्या करारा नुसार महावितरण विभागाला महानिर्मिती कंपन्या कडून सुमारे ७ हजार मेगावॅट व मे. अदानी पॉवर कंपनी कडून ३०८५ मेगावॅट वीज मिळणे अपेक्षित होते. मात्र कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यात आलेल्या अडचणीमुळे महानिर्मितीकडून सुमारे ४,५०० मेगावॅट व मे. अदानी कंपनी कडून १,७०० ते २००० मेगावॅट इतकीच वीज मिळत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. खुल्या बाजारातूनही ३९५ मेगावॅट वीज खरेदी केली. अतिरिक्त वीज खरेदीसाठी महावितरण प्रयत्नशील असल्याचे महावितरणच्या जनसंपर्क प्रमुखांनी कळविले आहे.
सी-१ व सी-२ च्या यादीतील गावांना ३४ टक्के भारमान असून पालघर तालुक्यातील सातपाटी, शिरगाव, केळवे, सफाळे आगरवाडी, तर डहाणतील घोलवड, पारनाका या फिडरवर वरील गावे अंतर्भूत असून त्यांना सव्वा दोन ते अडीच तासांचे भारनियमन राहणार आहे. डी-२ च्या यादीतील गावानां ४२ टक्के भारनियमन असून त्यात सफाळे (एडवण), व बोईसर (वंजार वाडा) या फिडरवरील अंतर्भूत गावांना दिवसाला दोन भागात पावणे तीन तासांचे भारनियमन राहणार आहे.
जी-१, जी-२ व जी-३ ह्या यादीतील गावांना अनुक्र मे ६४टक्के, ७२ टक्के व ८० टक्केच भारिनयमन लादण्यात आले असून हा भाग ग्रामीण व शेती-बागायतीशी निगिडत आहे. पालघर (भोपोली), (ढेकाळे), बोईसर (महागाव), तारापूर, वरोर, तलेखल, (वारंगडे), डहाणू (आशागड), बोर्डी (कैनाड) कोसबाड, वाघमारे, बोरीगाव, बोर्डी, चारोटी, कासा, तलवाडा, जामशेत, आगवन, चिखला, वाकी, उधवा, तलासरी (वसा), वडोली, महालक्ष्मी, उपलाट, डोलार पाडा, वेवजी, जव्हार (न्याहाळे), वाळवंढा, विक्र मगड (आलोंडे), साखरे, मोखाडा, खोडाळा व असा ह्या फिडर वरील गावांना पावणे तीन तास ते कृषीक्षेत्रातील भागाला ५ तासापेक्षा जास्त भारनियमन लादण्यात आल्याने शेती-बागायती क्षेत्र व औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसत आहे.
>मनोर, जव्हार, बोईसरची स्थिती
इ-१ व इ-२ च्या यादीतील गावांना ५०% भारिनयमन असून मनोर,रामबाग आणि जव्हार ह्या फिडर वरील गावांना प्रतिदिन दोन वेळा सव्वातीन तासाचे भारिनयमन आहे. एफ-१ व एफ-२ च्या यादीतील गावांना ५८ टक्के भारिनयमन असून मनोर गाव, बोईसर (आर) चिंचणी, नागझरी, नांदगाव, जांभूळ गाव), महालक्ष्मी, तलासरी, डोलार पाडा, विक्र मगड ह्या फिडरवरील गावांना दिवसाला २ वेळा साडेतीन तासांचे भारिनयमन असणार आहे.
पालघर महावितरण विभागांतर्गत येणाºया पालघर, सफाळे, बोईसर (आर), डहाणू, तलासरी, विक्र मगड, जव्हार, मोखाडा ह्या सबस्टेशन अंतर्गत गावांना पुरविण्यात येणारा विद्युत पुरवठा व त्याची होणारी वसुली ह्या निकषांच्या आधारे भारिनयमन लादण्यात आले आहे.ए-१ व ए-२ च्या यादीत पालघर शहर, बोईसर, वाणगाव (पास्थल), डहाणू गाव, डहाणू रोड, मसोली ह्या फिडर मधील अंतर्भूत गावांना १८ टक्के भारमान ठेवून दिवसाला दोन वेळा दीड दीड तास विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हे प्रमाण तुलनेने कमी आहे.बी-१ व बी-२ च्या यादीत २६ टक्के भारनियमन ठेवून पालघर (गणेश कुंड), उमरोळी, माहिम, सफाळे, बोईसर-नांदगाव, केपी नगर, डहाणू (जव्हार रोड), व जव्हार या फिडरवरील गावांना दिवसातून दोनवेळा दोन-दोन तास भारनियमन राहणार आहे.

Web Title: Due to load-shedding, the pump is closed, the crops begin to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.