‘लोकमत’मुळे शैक्षणिक नवोपक्र म सामान्यांपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:28 PM2019-08-01T23:28:43+5:302019-08-01T23:29:18+5:30

सोशल मीडियावरून सर्वत्र गेली बातमी : सार्वजनिक स्तरावर दखल; विद्यार्थ्यांना मिळाली टेक्नोटच अनुभूती

 Due to 'Lokmat', educational initiatives have reached a common ground | ‘लोकमत’मुळे शैक्षणिक नवोपक्र म सामान्यांपर्यंत पोहोचले

‘लोकमत’मुळे शैक्षणिक नवोपक्र म सामान्यांपर्यंत पोहोचले

Next

डहाणू/बोर्डी : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या शैक्षणिक नवोपक्रम बातम्यांना शाळांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळून विद्यार्थ्यांना टेक्नोटच अध्ययन अनुभूतीचा आनंद मिळतो आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील या डिजिटल क्लास रूममध्ये भविष्यातील शास्त्रज्ञ घडण्यास हातभार लागणार आहे.

घोलवडनजीकच्या शंकरपाडा शाळेत ‘एक्स्प्लोरर फॉर मर्ज क्यूब’च्या माध्यमातून खगोलीय संकल्पना विद्यार्थ्यांना समजावण्यात आल्याची बातमी लोकमतने प्रसिद्ध केली. त्यानंतर या नवोपक्रमाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक वर्गात पसरली. त्याची चर्चा होऊन शाळांमधून हे प्रयोग राबविण्यात येत आहेत. डहाणू शहरातील मूकबधीर बाल विकास केंद्र शाळेतील ४ ते ५ वी इयत्तेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांना हा प्रयोग संदीप राठोड, प्रेमचंद दाभाडे, निमत राऊत या शिक्षकांनी दाखविल्यानंतर हे विद्यार्थी अक्षरश: भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तर नासाचे मार्स रोव्हर हे यान २०२० साली मंगळावर झेपावणार असून, यानातील स्टेनसिल्ड चिपवर गोवणे शाळेतील ३६ विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद गुरु जींनी करून बोर्डिंग पास मिळविल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नावाची नोंद केली. या मोहिमेत सहभागी होण्याची माहिती केवळ लोकमतच्या माध्यमातून मिळाल्याने कुटुंबियांची नोंद करता आल्याची प्रतिक्रि या महेश सुरती यांनी व्यक्त केली. दरम्यान, ‘अभ्यासाला जोड झिरो बजेट फोर-डी होलोग्राम तंत्रज्ञानाची ’ या बातमीतूनही महागडे तंत्रज्ञान शिक्षकांच्या क्लृप्तीने बिन खर्चाने आकाराला आले. विविध अभ्यास घटक अभ्यासताना अध्ययन-अध्यापन प्रक्रि या सोपी करण्यासाठी त्याचा लाभ होत आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून याचे प्रयत्न सुरू आहेत.

या नवोपक्र मांची माहिती बातमीतून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविण्यात आला. हे विद्यार्थी कर्णबधिर असल्याने या प्रयोगाच्या माध्यमातून अभ्यासातील अमूर्त संकल्पना समजावून सांगणे यापुढे सोपे होणार आहे.’ - शोभा चव्हाण (मुख्याध्यापिका,
मूकबधीर बाल विकास केंद्र)

Web Title:  Due to 'Lokmat', educational initiatives have reached a common ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.