महावितरणमुळे कोलदा तहानला
By admin | Published: March 5, 2017 02:28 AM2017-03-05T02:28:38+5:302017-03-05T02:28:38+5:30
मोरहंडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोलद्याचा पाडा येथील नळपाणी पुरवठा योजना वीजमीटर जोडणी अभावी बाळगली असल्याने मोखाड्यातील महावितरणाचा
- रविंद्र साळवे, मोखाडा
मोरहंडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या कोलद्याचा पाडा येथील नळपाणी पुरवठा योजना वीजमीटर जोडणी अभावी बाळगली असल्याने मोखाड्यातील महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
३७६ लोकसंख्या असलेल्या कोलदयाच्या पाडा येथील ग्रामस्थांना दरवर्षीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. रणरणत्या उन्हात कोसोमैल अंतर तुडवत
येथील आदिवासींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे
येथील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने
पेसा अंतर्गत ७ लाख निधी
खर्च करण्याचे एकमताने ठराव मंजूर करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु मोखाडा महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वीज मीटरची जोडणीच केली जात नसल्याने येथील नळपाणी पुरवठा योजना राबविण्याचे स्वप्न हवेत विरले आहे.
तारीख पे तारीख
या नळपाणी पुरवठा योजनेच्या वीज मीटर जोडणीसाठी १५ ते २०
पोल लागणार आहेत याची सर्व
पूर्तता लवकरच करून मंजुरी दिली जाणार आहे अशी महिती कनिष्ठ अभियंता शशांक टोरपे यांनी दिली आहे.
खासदारांच्या पत्रालाही केराची टोपली
वर्ष २०१३ पासून येथील ग्रामस्थ मोखाडा महावितरण कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. मे २०१६ मध्ये खासदार चिंतामण वनगा यांनी यांनी सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी महावितरण पालघर व मोखाडा यांना पत्रव्यवहार करून देखील अजून पर्यत याची दखल घेतलेली नाही.