चिकूवाडीतील दुग्ध व्यवसाय संकटात, पावसाने पावळी व गवताचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:45 AM2017-12-13T02:45:14+5:302017-12-13T02:45:28+5:30

ओखी वादळाने पाऊस पडून पावळी आणि गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने चिकूवाडीतील दुग्ध व्यवसायावर संकट ओढवले आहे. दरम्यान सीमा भागातील या शेतीपूरक व्यवसायाला डबघाईपासून वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.

Due to the milk business crisis of Chikwad, rain and blossom damage due to rain | चिकूवाडीतील दुग्ध व्यवसाय संकटात, पावसाने पावळी व गवताचे नुकसान

चिकूवाडीतील दुग्ध व्यवसाय संकटात, पावसाने पावळी व गवताचे नुकसान

Next

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : ओखी वादळाने पाऊस पडून पावळी आणि गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने चिकूवाडीतील दुग्ध व्यवसायावर संकट ओढवले आहे. दरम्यान सीमा भागातील या शेतीपूरक व्यवसायाला डबघाईपासून वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे.
पालघर जिल्हयात चिकू फळाच्या बागायती मोठ्या प्रमाणात आहे. या बागायतीला पाणी व खत, औषध फवारणीपासून ते चिकू फळांची तोडणी, वर्गवारी, पॅकेजिंग या कामामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर रोखण्यात त्याचा मोठा वाटा आहे. शिवाय उच्चशिक्षित युवकांनी चिकू फळापासून बायप्रॉडक्ट आणि चिकूपासून वाईन बनविण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. या शिवाय चिकू वाडीतील दुग्ध व्यवसाय हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भात शेतीतून मिळणारी पावळी आणि माळरानावर उगविणारे गवत विपुल प्रमाणात व कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने दुग्ध व्यवसायाला बळकटी आली. जनावरांना वर्षभर लागणाºया सुक्या चाºयाची बेगमी करतांनाच अनेक शेतकरी गवत व्यापारी तसेच गवताचे निर्यातदार बनले आहेत. येथील अनेक बागायती गुजरात आणि राजस्थान या परराज्यातून आलेल्या दुग्ध व्यावसायिकांनी भाडेतत्वावर घेतल्या असून त्याचा आर्थिक फायदा स्थानिक शेतकर्यांना होत आहे. चिकू फळाला अल्पदर मिळणाºया काळात आणि पावसाळ्यात शेतकºयांना त्यामुळे मोठा हातभार लागतो.
सीमा भागातील बोर्डी आणि परिसरातील गावांमध्ये या परंपरागत व्यवसायाची पाळेमुळे खोलवर रुजलेली दिसतात. त्यामुळेच वसई-विरारनंतर झाई-बोरिगाव दूध संकलन केंद्राची स्थानिक महिला बचत गटाने सहकार तत्वावर केलेली उभारणी हे वाखाणण्याजोगे पाऊल ठरले आहे. येथे तलासरी व डहाणू तालुक्यातून तसेच गुजरात राज्यातील उंबरगाव येथून दूध आयात केले जाते. त्यामुळे या भागातील धवलक्र ांतीला शासनाने गांभीर्याने घेतल्यास गट शेतीच्या माध्यमातून नवा पॅटर्न उदयास येऊन जिल्ह्याला नवी ओळख प्राप्त होईल. दुधाचे वाढते उत्पादन हे परिसरातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण अल्प असण्याचे गमक आहे.
दरम्यान ओखी वादळासोबत या भागात दोन दिवस पाऊस झाला, त्यानंतरचे काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहिल्याने पावळी आणि सुक्या गवताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयाला आर्थिक भुर्दंड पडला असून दुग्ध जनावरांसाठी सुक्या वैराणीचा प्रश्न किमान पुढील वर्षापर्यंत सतावणारा ठरणार आहे. त्याच प्रमाणे जमिनीत ओलावा असल्याने हिरव्या गवतासाठी मका, ज्वारीची पेरणी करता न आल्याने स्थानिक दूध उत्पादक कोंडीत सापडला आहे. सुक्या चाºयामुळे जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढून दुधाचे प्रमाण वाढते. मुबलक चाºया अभावी दूध उत्पादनात घट होऊन जनावरांच्या शेणाच्या प्रमाणात घट होईल. चिकू झाडांना कमी शेणखत मिळाल्यास उत्पादनावर तसेच फळाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. परिसरात सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे स्थानिक शेतकºयांना जादा पैसे देऊन शेणाची आयात बाहेरून करावी लागेल. मुख्य म्हणजे या खताच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावर स्थानिकांना पाणी सोडावे लागेल.

संकलन केंद्रात गाई आणि म्हशीच्या दुधातील फॅटनुसार दर दिला जातो. या करिता म्हशीच्या दुधात किमान ५ तर गाईच्या दुधात ३ फॅट असणे गरजेचे आहे. त्यामुळे जनावरांच्या खुराकाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असून त्या दृष्टीने पावली किंवा गवताचे महत्व अनन्यसाधारण आहे. यावर्षी सुक्या गवताची खरेदी तीन रु पये प्रतिकिलोने सुरु होती, मात्र अवकाळीने गवत भिजल्याने नासाडी झाली त्याचा दुग्ध व्यवसायावर परिणाम जाणवणार आहे.
- नितेश चुरी, दुग्ध व्यावसायिक

Web Title: Due to the milk business crisis of Chikwad, rain and blossom damage due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.