अपंगत्वावर मात करून दिली दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:35 PM2019-03-24T23:35:44+5:302019-03-24T23:36:01+5:30
मनोर जवळील अतिदुर्गम भागातील धुकटन व कोंढान येथील दोन विध्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करू न लालबहादूर शास्त्री हायस्कुल या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा दिली आहे.
मनोर : मनोर जवळील अतिदुर्गम भागातील धुकटन व कोंढान येथील दोन विध्यार्थ्यांनी अपंगत्वावर मात करू न लालबहादूर शास्त्री हायस्कुल या परीक्षा केंद्रात दहावीची परीक्षा दिली आहे.
धुकटन येथील विनोभाई राधा पाटील शाळेतील शंकर विलास भोईर याचे दोन्ही हात व पाय अधू असताना अपंगत्वावर मात करून त्याने दहावीची परीक्षा दिली. त्याला दहावीनंतर संगीत क्षेत्रामध्ये कारकीर्द करायची आहे. तसेच जयेश गोविंद पाटील, रा.कोंढाण, शाळा लाल बहादूर शास्त्री हायस्कुल मनोर येथे शिक्षण घेणारा हा विद्यार्थी अंध असून रेकॉर्डिंग व मोठी अक्षरे काढून अगदी डोळ्यासमोर पुस्तके ठेवून अभ्यास केला व दहावीची परीक्षा दिली. त्याला कॉमर्स क्षेत्रात पदवी घ्यायची आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची मनोर लाल बहादुर शास्त्री हायस्कुल परीक्षा केंद्रावर जाऊन महेश संखे, सचिन धनगावकर , विनायक गोºहेकर व चेतन पाटील यांनी आर्थिक मदत व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी पाठबळाचे आश्वासन दिले.