निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळे विकास खोळंबला, चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:15 AM2018-01-03T06:15:55+5:302018-01-03T06:16:07+5:30

जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर प्रभावीपणे काम करायला हवे. मात्र, निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधी कडून ह्या संदर्भात पाठपुरावा होत नसल्याने विकास खोळंबला असल्याच्या प्रतिक्रि या पालघर जिल्हा पत्रकार संघाचे आयोजित ‘पालघर जिल्ह्याचा विकास:आमची भूमिका’ ह्या चर्चा सत्रात उमटल्या.

 Due to passive public representatives due to development, | निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळे विकास खोळंबला, चर्चासत्रातील सूर

निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळे विकास खोळंबला, चर्चासत्रातील सूर

Next

पालघर - जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर प्रभावीपणे काम करायला हवे. मात्र, निवडून दिलेल्या आपल्या लोकप्रतिनिधी कडून ह्या संदर्भात पाठपुरावा होत नसल्याने विकास खोळंबला असल्याच्या प्रतिक्रि या पालघर जिल्हा पत्रकार संघाचे आयोजित ‘पालघर जिल्ह्याचा विकास:आमची भूमिका’ ह्या चर्चा सत्रात उमटल्या.
पालघर जिल्हा निर्मितीला ३ वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही जिल्ह्याचा विकासच झाला नाही. अशा विविध नकारार्थी प्रतिक्रि या या चर्चासत्रात सर्वसामान्यातून सहज पणे उमटत होत्या. त्यामुळे नेमका विकास म्हणजे काय? आणि जिल्हावासीय, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ह्यांना कुठल्या प्रकारचा विकास अभिप्रेत आहे. त्यासाठी काय उपाय योजना आखायला हव्यात ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न जिल्हा पत्रकार संघाने या निमित्ताने केला.
जिल्ह्यातील सर्व सामाजिक-राजकीय व प्रशासकीय अधिकाºयांना एका छताखाली आणण्यातही जिल्हा पत्रकार संघाच्या प्रयत्नांना यश आले. बोईसरच्या टिमा सभागृहात शुक्र वारी आयोजित करण्यात आलेल्या ह्या कार्यक्र माला जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आयकर आयुक्त बिना संतोष, शिक्षण महर्षी रजनीकांत भाई श्रॉफ, जिजाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, कुणबी सेनेचे जितेंद्र राऊळ, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, डॉ.पºहाड, जनतादलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर, जि प सदस्य शुभांगी कुटे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, महेंद्र संखे आदी मान्यवर ह्यावेळी उपस्थित होते.
यावेळी पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याचे आवाहन यावेळी वास्तुविशारद महेंद्र काळे यांनी प्रशासनास केले. कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी येथील कृषी क्षेत्रात बदल करण्यासाठीचे मार्गदर्शन देत येथे उत्पादित केलेल्या शेतमालास हमी भाव मिळायला हवा अस सांगितले.

प्राचार्य डॉ. सावे यांची खंत...
आरोग्याच्या संदर्भात कुपोषण, गर्भवती माताच्या समस्या आणि नवजात बालकांचे आरोग्य ह्या समस्या एकमेकांशी निगिडत आहेत. अश्या वेळी जो पर्यंत आरोग्य सेवेचे प्रभावी जाळे दुर्गम व आदिवासी बहुल भागात विणले जात नाही तो पर्यंत ह्या समस्यांचे उच्चाटन होणे अशक्य आहे. त्यासाठी ह्या भागा मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, बीएससी निर्संग त्वरित सुरू झाल्यास स्थानिक तरु ण डॉक्टर तर तरु णी निर्संग क्षेत्रात येऊन त्याचा फायदा आपल्या भागाला होऊ शकतो असे मत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सावे ह्यांनी व्यक्त केले. मात्र, शासन पातळीवरून त्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
पालघर नवनगरच्या निर्माणाचे भाग्य
जिल्ह्यातील प्रशासकीय आव्हाने विशद करुन जिल्हाधिकारी म्हणून ‘पालघर नवनगर’ निर्माण करण्याचे भाग्य आपल्या वाट्याला आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांंना सक्षम करण्याकडे लक्ष देणे, आश्रमशाळा, जि. प. व माध्यमिक शाळांचे सबलीकरण, अंगणवाडीत येणाºया कुपोषित बालकांच्या माता, गरोदर महिलांना हाती काम देण्यासाठी एक कोटीचा निधी, वनहक्क करीता काम, मनरेगाअंतर्गत कृषी क्षेत्रातील क्लस्टर योजना, मच्छीमारांसाठी शीतगृह, क्लस्टर, मार्केटिंग वाहनं या दृष्टीने कामाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात कोणतीही योजना राबविताना आराखडे महत्वाचे असून या आराखड्याना पायाभूत सुविधा येथे उपलब्ध नसून ते बनाविण्याकामी आम्ही यथेच्छ सहकार्य करू.
- ब्रायन लोबो (कष्टकरी संघटना)

जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी सुदृढ नागरिक घडविला पाहिजे व जेव्हा सुदृढ नागरिक म्हणून येथे असलेली पिढी व पुढील पिढी जन्माला येईल तिला शिक्षणासोबत बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाची व कौशल्य विकासाची जोड दिल्यास ती पिढी स्वत:ला समृद्ध करेल. - मिलिंद बोरीकर, सीईओ (जि.प.)

Web Title:  Due to passive public representatives due to development,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.