विषबाधेमुळे श्वानासह ३ नवजात पिल्लांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:42 PM2018-12-11T22:42:59+5:302018-12-11T22:43:32+5:30

नायगाव पूर्वेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये मादी श्वान व तिच्या तीन नवजात पिल्लांचा विषबाधेमुळे तरफडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

Due to poisoning, 3 newborns die with dogs | विषबाधेमुळे श्वानासह ३ नवजात पिल्लांचा मृत्यू

विषबाधेमुळे श्वानासह ३ नवजात पिल्लांचा मृत्यू

Next

वसई : नायगाव पूर्वेतील गोकुळधाम सोसायटीमध्ये मादी श्वान व तिच्या तीन नवजात पिल्लांचा विषबाधेमुळे तरफडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या मादी श्वानाने नुकतीच पाच गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. त्यामध्ये विषबाधेमुळे तिच्यासह तीन पिल्ले मरण पावली असून दोन पिल्लांना वाचविण्यात प्राणी मित्रांना यश आले आहे.

नायगाव येथील गोकुळधाम सोसायटी ६ मध्ये ही मादि श्वान आपल्याला पिल्लांसह आश्रयाला राहत होती. परंतु आजबाजूच्या परिसरात टाकण्यात येणाऱ्या उघड्यावरील खाण्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती प्राणी मित्र मितेश जैन यांना मिळाली होती. सोसायटीमध्ये राहणाºया प्राणी मित्र निरु पमा रवींद्र यांना सोसायटीमध्ये राहणाºया काही नागरिकांनी ही पिल्ले हटविण्यास देखील सांगण्यात आले होते परंतु, ती पिल्ले न हटविल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत मृत्यू झालेल्या श्वान व पिल्लांना पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच याबाबत वालीव पोलीस ठाण्यात पशु क्रूरता कायदा १९६० च्या कलम ४२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जेव्हा पोस्टमार्टेमचा अहवाल जेव्हा समोर येईल तेव्हा याबाबत अधिक माहिती समोर येईल असेही सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ डॉक्टरांना बोलावून अत्यवस्थ दोन पिल्लांवर उपचार सुरु केल्याने दोन पिल्ले वाचली असल्याचे मतिेश जैन यांनी सांगितले आहे. मात्र या मुक्या प्राणांना मुद्दाम विषारी अन्न दिले गेले असल्याचा आरोप मितेश जैन यांनी केला आहे.

Web Title: Due to poisoning, 3 newborns die with dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.