पावसाचा मच्छीलाही फटका, मच्छीमारांवर उपासमारीची पाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:19 AM2017-10-25T03:19:32+5:302017-10-25T03:19:35+5:30
पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत.
हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टीने शेतक-यांसोबत मच्छीमार व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले असून बांबूवर( वलांदी)वर वाळत टाकलेले मासे सततच्या पावसामुळे कुजून गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांसोबत मच्छीमाराना ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मार्क्सवादी पक्षाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
जिल्ह्याला ११० कि.मी.चा सागरी किनारा लाभला असून वसई,अर्नाळा,नायगाव,कोरे,दातीवरे एडवन , केळवे, वडराई, सातपाटी, मुरबे, नवापूर, उच्छेली-दांडी, तारापूर,घिवली, डहाणू, बोर्डी इ.गावातून मोठ्या प्रमाणात बोंबील, मांदेली, करंदी,जवळा इ. मच्छीची डोल पद्धतीने मासेमारी केली जाते. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत या मच्छीची आवक समाधानकारक असल्याने या किनारपट्टीवर बांबूवर,मचाण लावून मासे सुकविले जातात. ह्या सुकवलेल्या मच्छीला स्थानिक बाजारपेठेसह नाशिक ,धुळे, जळगाव, पुणे इ. भागात मोठी मागणी असते.सध्या मासेमारी व्यवसायावर अनेक संकटे ओढावली असून हा व्यवसायच देशोधडीला लागण्याची चिन्हे दिसत आहेत.त्यातच ७ आॅक्टोबर पासून अधून मधून ८ दिवस पडणाºया पावसाने किनारपट्टीवर सुकविण्यासाठी ठेवलेले मासे कुजून गेल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीत त्यांच्यावर ही आपत्ती ओढावली आहे.
>मच्छीमारांनाही नुकसानभरपाई देण्याची शासनानकडे मागणी
मागील अनेक वर्षांपासून मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असतांनाही आलेल्या संकटांचा मच्छीमार सामना करीत आला आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांवर उपासमारी ओढवून त्यांच्यात आत्महत्येचे लोण पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे शासनाने शेतकºयांप्रमाणेच मच्छीमारांना ही नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भारताचा क्र ांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे सचिव कॉ. राजेश दवणे, साईनाथ तामोरे, संतोष तामोरे,शाम नाईक,सुखदेव आरेकर ह्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.