रेतीबंदरांवर महसूल विभागाची धडक कारवाई
By admin | Published: June 11, 2017 02:46 AM2017-06-11T02:46:06+5:302017-06-11T02:46:06+5:30
मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सजा परिसरातील रेती बंदरावर प्रांताधिकारी विकास गजरे, तहसिलदार महेश सागर, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी छापे टाकून
- आरीफ पटेल। लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या सजा परिसरातील रेती बंदरावर प्रांताधिकारी विकास गजरे, तहसिलदार महेश सागर, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी छापे टाकून रेती साठा व वाहनांवर दंडात्मक कारवाई करून २७ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले.
मनोर, नावझे, साखरे, गिराळे, तसेच सर्व बंदरामध्ये महसूल विभागाने छापे टाकून अवैध रेती उपसा करणाऱ्या, व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून २७ लाख रु पये सरकार जमा केले तसेच बंदरावर जाणारे रस्ते जे सी बी लाऊन चर खोदून बंद केले अशा पध्दतीने अनेक वेळा कारवाई करण्यात येते मात्र रेती व्यापर करणाऱ्यांकडून रेती उत्खनन बंद होत नाही. महिना पंधरा दिवस झाले की तिच परिस्थिती पुन्हा निर्माण होते.
मंडळ अधिकारी वसंत बर्वे, तलाठी नितीन सुर्वे, सदानंद भोईर, चुरी, पाटील, अहिरे हे नेहमी रेतीची अवेध वाहतूक करणारी वाहने पकडतात बंदरावर जाऊन रात्री बे रात्री जीव धोक्यात घालून कारवाई करतात तरी सुद्धा रेती व्यावसायिक छुप्या पध्दतीने वाहतूक करतात महसूल विभागाने कडक कारवाई केली तरच हे थांबू शकते.