माणिकपूर पोलिसांच्या तपासामुळे प्रवाशाला परत मिळाला महागडा ४० हजार रुपयांचा मोबाईल फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 12:36 PM2022-03-25T12:36:07+5:302022-03-25T12:36:21+5:30
पीडित प्रवाश्याकडून माणिकपूर पोलिसांचे आभार
माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक व तत्पर तपासामुळे जेष्ठ नागरिक रिक्षा प्रवाशाला परत मिळाला महागडा ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन
अवघ्या दोन तासांच्या आतच केला तपास ; पीडित प्रवाश्याकडून माणिकपूर पोलिसांचे आभार
वसई :
- आशिष राणे
वसई : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ अंतर्गत वसई रोड स्टेशन भागातून प्रवास करताना रिक्षेत हरवलेल्या मोबाईलचा अवघ्या दोन तासांच्या आतच छडा लावत त्या प्रवाशाला तो परत ही केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी माणिकपूर पोलिसांच्या टीमने तांत्रिक व सतर्कता दाखवून केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे एका त्रस्त रिक्षा प्रवाश्याला त्याचा रिक्षेत हरवलेला ४० हजार रुपये किमतीचा आय फ़ोन मोबाईल परत मिळाल्यानं त्या प्रवाशी नागरिकाने माणिकपूर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२४ मार्च रोजी संध्याकाळी उशिरा ७.१९ वाजताच्या दरम्यान पीडित निरंजन देसाई (60 वर्षे) म्हणुन जेष्ठ नागरिक हे वसई रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरामध्ये एका रिक्षेतुन प्रवास करीत असताना त्यांचा (आय फोन एस ई ) कंपनीचा ४० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल, प्रवासी रिक्षात विसरल्यामुळे त्यांनी तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिस अधिकाऱ्याकडून मदत मागितली होती.
दरम्यान त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक तडवी यांनी त्यांच्या कडून संपूर्ण हकीगत माहीत करून घेतली आणि आपल्या सहकारी कर्मचारी व अधिकारी वर्गास या मोबाईल तपास विषयी मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे या तपासा दरम्यान या मोबाईलचा अॅपल आयडी पासवर्ड उपलब्ध नसताना तसेच रिक्षा बाबत काही एक उपयुक्त माहिती नसताना, देखील सदर रिक्षाचा व मोबाईलचा सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने या टीमनं शोध घेतला आणि अखेर रिक्षा व त्या चालकास शोधून काढले.
परिणामी रिक्षा व मोबाईल चा तपास लागताच निरंजन देसाई यांनी सुटकेचा निश्वास सोडला एकूणच पोलिसांनी सतर्कता दाखवून महागडा मोबाईल अवघ्या तासांत शोधून काढला हे कौतुकास्पद आहे. आणि यासाठी देसाई यांनी या तपासात सहकार्य करणारे माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तडवी ,पोलीस नाईक प्रशांत पाटील व अन्य सहकारी तसेच संबंधित रिक्षा संघटना पदाधिकारी व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या चे आभार मानले आहेत.