‘त्यांच्या’ सतर्कतेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचे वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:08 AM2024-09-02T10:08:33+5:302024-09-02T10:09:05+5:30

Dahanu News: डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सहकारी विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला आणि तिचा जीव वाचला.

Due to 'their' vigilance, the life of the student in the ashram school was saved | ‘त्यांच्या’ सतर्कतेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचे वाचले प्राण

‘त्यांच्या’ सतर्कतेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचे वाचले प्राण

 पालघर - डहाणू तालुक्यातील रानशेत येथील आश्रमशाळेत दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सहकारी विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला आणि तिचा जीव वाचला. या विद्यार्थिनीला उपचारासाठी सिल्वासामधील विनोबा भावे रुग्णालयात हलवले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. या प्रकरणात रॅगिंगचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती  मिळालेली नाही.

रानशेत आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने रविवारी सकाळी नऊच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वच्छतागृहात जाऊन ओढणीच्या साहाय्याने तिने गळफास घेतल्यानंतर ती बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्या सहकारी विद्यार्थ्यांनी हा प्रसंग पाहून तत्काळ शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला याची माहिती दिली. सफाई कामगाराने तत्काळ धाव घेतली. विद्यार्थिनीला खाली उतरवून कासा उपजिल्हा रुग्णालयात नेले. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार केले. प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी विनोबा भावे रुग्णालयात हलविले. 

सध्या महिला, विद्यार्थिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. 
- अमित घोडा, माजी आमदार. 

ही निवासी अनुदानित आश्रमशाळा आहे. काही विद्यार्थिनींमध्ये त्यांच्याकडील वस्तूंवरून वाद झाल्याचे समजते. दहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलीला राग अनावर झाल्याने तिने स्वच्छतागृहात जाऊन ओढणीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.  - सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी, डहाणू.

Web Title: Due to 'their' vigilance, the life of the student in the ashram school was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.