रिक्त पदांमुळे जव्हार पोलिसांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:14 AM2018-05-20T03:14:02+5:302018-05-20T03:14:02+5:30
आकृतीबंधानुसार ८८ पोलीस शिपाई पंदे मंजूर असून पैकी जव्हार पोलीस ठाण्यात ४२ पोलिस शिपाई पंदे रिक्त आहेत.
जव्हार : जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत एकीकडे गुन्हेगारीमध्ये वाढ होत असताना पोलीस प्रशासनाची तोकड्या कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यामुळे दमछाक होत आहे. दीड लाख लोकसंख्येसाठी अवघे ४६ पोलीस शिपाई, दोन उप पोलीस निरिक्षक आणि एक सहायक पोलीस निरिक्षक अशी प्रत्यक्ष रचना आहे.
आकृतीबंधानुसार ८८ पोलीस शिपाई पंदे मंजूर असून पैकी जव्हार पोलीस ठाण्यात ४२ पोलिस शिपाई पंदे रिक्त आहेत. या स्थितीमुळे तोकड्या मनुष्यबळावर अतिरिक्त कामांची जबाबदारी येत आहे. त्यामुळे ही रिक्त पंदे त्वरित भरावीत अशी मागणी होत आहे.
तालुक्यात १ लाख ६० हजार लोकसंख्या असून, १०९ महसूली गावे, २५३ पाडे आहेत. मात्र एवढ्या लोकसंख्येची व भौगोलिक क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या ४६ पोलिसांवर आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांबाळा व न्याहाळे ही दोन दूरक्षेत्र आहेत. तर जव्हार, खांबाळा, न्याहाळे, जामसर, तलावली, वाळवंडा, हे ६ बिट आहेत. मात्र पोलिसांच्या अनेक रिक्त पदांमुळे त्यांना प्रत्येक विषयाकडे तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथील पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही कामे करावी लागत आहेत. अतिरिक्त कामामुळे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. कर्मचारी कमतरतेमुळे नागरिकांचीही कामे वेळेत होत नसल्याची तक्र ार होत असते.
तालुक्याच्या ठिकाणी नेहमी राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे मोचे, आंदोलने आणि रास्तारोको असतो. तसेच, दररोज वाद, भांडण, तंटे, मिटविण्यासाठी गर्दी असते. मात्र वाद, तंटे, भांडण, आणि आठवड्यातून येणारे मंत्री, पुढारी, राजकारणी, अधिकारी वर्ग, यांना सुरक्षा द्यावी लागते. त्यामुळे जव्हार पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई कर्मचारी कमी पडत आहेत.
तसेच जव्हार हे पर्यटनस्थळ असल्याने नेहमी पर्यटकांची वर्दळ असल्याने त्यांचीही जबाबदारी पोलिसांवर असते. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील रोजची बिट निहाय कामे पोलिसांना उरकावी लागत आहेत. कर्मचाºयांची कमतरता असल्याने बरेच पोलीस शिपाई बद्दली करूनच जाण्याच्या बेतात आहेत. ज्यांची बद्दली जव्हार पोलीस स्टेशनला होते, तेही यायला तयार नसल्याचे पोलीस निरीक्षकांनी भोये यांनी लोकमतला सांगितले. त्यातच या भागातील दमण दारु, जुगार मटका आदी विषय डोक वर काढताना दिसतात. अशा वेळी कुठे कुठे लक्ष द्यावे असा सवाल पोलिसांचा आहे.
जव्हार पोलीस ठाण्याला ८८ मंजूर पंद, यापैकी ४६ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. या रिक्त पदांमुळे आम्हला त्रास सहन करून, पोलिसांचे कामे करावी लागत आहेत. रिक्त पदांचाभार रोजच कामे करणाºया पोलिसांवर पडत आहे.
- डी.पी. भोये, पोलीस निरीक्षक जव्हार