वाड्यातील डम्पिंगचे चेंडू सेनेच्याच कोर्टात, सत्ताधारीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:18 AM2018-04-05T06:18:27+5:302018-04-05T06:18:27+5:30

वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गंधीची जबाबदारी सत्ताधाºयांकडेच जाते.

 The dumping of the castle is in the court of the Senate, the official responsible | वाड्यातील डम्पिंगचे चेंडू सेनेच्याच कोर्टात, सत्ताधारीच जबाबदार

वाड्यातील डम्पिंगचे चेंडू सेनेच्याच कोर्टात, सत्ताधारीच जबाबदार

Next

- वसंत भोईर
वाडा  - वाढत्या वाडा शहराची लोकसंख्येने ३५ हजाराचा आकडा पार केला असला तरी दररोज निघणाऱ्या कचºयासाठी डम्पिंग ग्राऊंडचा विषय सुटलेला नाही. शहरातील राजकारणाची धुरा नगरपंचायत होण्या आधी व नंतर शिवसेनेकडेच राहीली असल्याने अनेक वर्षांपासून खितपत असलेल्या या दुर्गंधीची जबाबदारी सत्ताधाºयांकडेच जाते.
येथील नगरपंचायतीला डिम्पंग ग्राऊंड नसल्याने सध्या एका खासगी जागेत संपुर्ण शहराच्या कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. हा कचरा भिवंडी-वाडा महामार्गाच्या कडेला टाकला जात असल्याने प्रवाशांना दुर्गंधीने त्रस्त केले आहे. रोजच्या ढीगभर कचºयाचा निचरा करायचा तरी कसा असा प्रश्न नगरपंचायत प्रशासनाला पडला आहे.
पुर्वीची ग्रामपंचायत व आताची नगरपंचायतीमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना सत्तेत आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा येथील स्थानिक असतानाही या महत्वाच्या समस्येला तात्पुरता पर्याय देण्या खेरीज कुणीही कायमचा उपाय करू शकला नाही हे दुर्दैव आहे. मात्र, ही जबाबदारी तत्कालिन ग्रामपंचायत व सध्याच्या नगरपंचायतीची असल्याने दुर्गंधीचा हा चेंडू शिवसेनेच्याच कोर्टात पडलेला आहे.
नगरपंचायत सध्या उमरोठे रोड या भागात नवीन जागा भाड्याने घेण्याच्या तयारीत आहे मात्र, वनविभाग किंवा अन्य सरकारी जागा कायमस्वरूपी मिळविण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागतो तो अद्याप तरी झालेला दिसत नाही यावरून ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने फक्त नावात बदल झाला बाकी जैसे थे आहे असेच दिसत आहे.
वाडा ग्रामपंचायत भाड्याने जागा घेऊन पूर्वी सिद्धेश्वरीरोड येथे कचरा टाकला जायचा व त्यानंतर हा डेपो आता वाडा भिवंडी महामार्गावर गांधरे गावाजवळ आहे. शहरातील घनकचरा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे अनेकदा महामार्ग अर्धा झाकला जातो तर, सुका कचरा पेटविल्याने धुराचे लोट वाहनांना अडथळा आणतात. या कचºयातील खाद्य पदार्थ खाण्यासाठी मोकाट गुरे व कुत्री गर्दी करीत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. खरंतर प्रत्येक निवडणूकीतील हा सर्वात महत्वाचा मुद्या असला तरी सेनेने त्यास मोठ्या खूबीने बगल दिली आहे.

सफाई कर्मचारी वाºयावर

-वाडा शहरातून सध्या दररोज
६ मॅजिक घंटा गाड्या व ७
ट्रॅक्टर इतका कचरा बाहेर निघतो. ज्यासाठी २ मॅजिक गाड्या तर दोन ट्रॅक्टर कार्यरत असतात.
- कचरा व्यवस्थापनासाठी नगरपंचयातीकडे २४ कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे आरोग्य सुरक्षेसाठी कोणतेही पोशाख नाहीत. किं वा प्रदुषण सुरक्षेची उपाय योजना नाही.


एका महिन्यात समस्या सुटेल - नगराध्यक्ष
नवीन जागे साठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार करून जागेच्या भाड्या विषयी चर्चा सुरू आहे. कुणालाही त्रास होणार नाही अशा नवीन जागेत हे डम्पिंग ग्राउंड येत्या महिना भरात स्थलांतरित होईल अशी माहिती वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर यांनी लोकमतला दिली.
 

Web Title:  The dumping of the castle is in the court of the Senate, the official responsible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.