भूकंपाची माहिती पाठविली मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:57 AM2017-12-27T02:57:20+5:302017-12-27T02:57:22+5:30

जव्हार : या तालुक्यात व शहरात मगंळवारी व सोमवारी जमीनीत हादरे बसल्यामुळे संपूर्ण शहर भयभीत झाले होते.

The earthquake was sent to Mumbai | भूकंपाची माहिती पाठविली मुंबईला

भूकंपाची माहिती पाठविली मुंबईला

Next

हुसेन मेमन
जव्हार : या तालुक्यात व शहरात मंगळवारी व सोमवारी जमिनीत हादरे बसल्यामुळे संपूर्ण शहर भयभीत झाले होते. त्यामुळे खेडोपाड्यातील जुन्या कुड्या मातीच्या घरांना या हाद-यामुळे भिंतीना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाळवंडा व कशीवली या दोन सजाची अक्षांस-रेखांशची माहिती भूकंप नियंत्रण कक्ष मुंबई येथील कार्यालयाला जव्हार तहसील कार्यालयाकडून माहिती पाठविण्यात आलेली आहे.
सन २०१३ ची पुनरावृत्ती होऊन पुन्हा २०१७ मध्ये अचानक जमीनीतून हादरे बसत असल्यामुळे परीसर भयभीत झाले होते, तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा, कशीवली व परीसरात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के बसले असून गावातील लोक रात्रभर घराबाहेर थांबले होते, तसेच या खेडोपाड्यातील कुडाच्या घरांना भेगाही पडल्या आहेत.
११ जुलै तसेच २० जुलै २०१३ रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यावेळी महसूल विभागाकडून आय.एम.डी. व डी.एम.एस. या खात्याकडे भूकंपाची कुठलीच नोंद नव्हती, मात्र कालांतराने हे धक्के कमी झाले व सन फेब्रुवारी २०१४ मध्ये पुन्हा भूकंपाच्या धक्के बसू लागले, त्यावेळी मात्र प्रशासन खडबडून जागे झाले व भूगर्भ तंत्रज्ञ बोलविण्यात आले, मात्र ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगून ते निघून गेले, दरम्यान धक्के मात्र बसतच होते, नागरीक भयभीत झाले होते, महिलावर्गानी आरडाओरड केली तर काही महिलांनी काही दिवस गाव सोडले होते, मात्र त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी शासनाची जबाबदारी स्वत: स्वीकारून नगर परिषदेमार्फत खाजगी भूगर्भ तज्ञ व जिआॅलॉजिस्ट बोलावून, भूगोल तज्ज्ञ डॉ. सुरेंद्र सी. ठाकूरदेसाई, रत्नागिरी व जिआॅलॉजिस्ट, सचिन कुलकर्णी यांना बोलाविण्यात आले होते. त्यावेळी या दोन्ही भूर्गभ तंत्रज्ञांनी जव्हारच्या दºयाखोºयातील खेडोपाड्यांना भेटी दिल्या व तेथील लोकांना भूगर्भाबाबतीत विचारपूस केली. त्यानंतर दुपारी १.०० वा. आदिवासी भवन येथे जमलेल्या नागरीकांना डॉ. ठाकूरदेसाई यांनी भूगर्भातील हादºयांबाबत माहिती दिली होती. जव्हार शहर हे उंच आणि डोंगराळ भागात आहे व येथे कडक काळ्यां दगडांचा थर तसेच अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने, भूगर्भात बाष्पीभवन होऊन दगडांमध्ये भेगा पडून ते एकमेकांवर आदळल्याने जमिनीतून गूढ आवाज येतात. मात्र येथे जिवितहानी होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉ.ठाकूरदेसाईंनी सांगितले. नाशीकमधील सह्याद्री पर्वतरांगा ते जव्हार डहाणू हा भाग भूकंप झोन ३ मध्ये येतो, झोन १ हे कमी तीव्रता, झोन २ मध्यम तीव्रता, झोन ३ अधिक तीव्रता व झोन ४ जास्त तीव्रता मध्ये मोडतात. त्यामुळे नाशीक-जव्हार- डहाणू हे भाग झोन ३ मध्ये येत असल्याने काही प्रमाणात या भागाला धोका होऊ असे सांगितले होते. दरम्यान ४/०८/२०१३ रोजी अखेर रात्री झालेल्या हादºयांची नोंद नाशीक येथील मेरीला २.३ रिश्टरस्केल ऐवढी नोंदविण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले होते.
>भूकंप नियंत्रण विभाग, मुबंई येथे जव्हार तालुक्यातील वाळवंडा व कशीवली सजांचे अक्षांस-रेखांष पाठविण्यात आले आहेत. नागरीकांनी भयभित होऊ नये.
- संतोष शिंदे,
तहसीलदार, जव्हार

Web Title: The earthquake was sent to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.