नायगाव रेल्वेस्थानकातील पूर्वेकडील मुख्य रस्ता बंद; नागरिकांचे झाले हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 08:12 AM2020-10-15T08:12:17+5:302020-10-15T08:12:22+5:30
करावी लागली पायपीट : शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून रस्ता खुला
पारोळ : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य प्रवाशांना लोकल प्रवासाला परवानगी नाही. त्यामुळे नायगाव रेल्वेस्थानकातील केवळ मुख्य रस्ताच सुरू होता. या रस्त्याचा वापर नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी करतात. तसेच, पूर्वेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेस्थानकात येण्यासाठीही हाच रस्ता आहे. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीपासून हा रस्ता आणि तिकीट खिडकी रेल्वे प्रशासनाने बंद केली. त्यामुळे प्रवाशांसोबतच पूर्व-पश्चिम येजा करणा:या नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
पूर्वेकडील मुख्य रस्ताच बंद केल्यामुळे प्रवाशांना नायगाव सबवेतून मार्ग काढून नायगाव स्थानकाला वळसा घालून स्थानकाच्या पश्चिमेला तिकीट काढायला जावे लागले. याचा महिलांना सर्वाधिक त्रस सहन करावा लागला. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त करून शिवसेनेकडे तक्रार करताच पूर्वेतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करून प्रशासनाला हा रस्ता पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले.
मंगळवारी मध्यरात्री अचानक रेल्वे सुरक्षा बल विभागाकडून नायगाव स्थानकाच्या पूर्वेतील मुख्य रस्ता आणि तिकीट खिडकी बंद केल्याने पूर्वेकडील नागरिकांना स्थानकाच्या पश्चिमेकडे येताना स्थानकाला वळसा घालून यावे लागले. मुख्य रस्ता बंद केल्याने स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर येण्यासाठी प्रवाशांना पायपीट करावी लागली. या गोंधळात अनेकांची लोकल चुकल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनकाळात सहा महिन्यांपासून इतर प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी नाही. मात्र, सर्वसामान्यांसाठी येजा करण्यासाठी लॉकडाऊनमध्येही सुरू असलेला पूर्वेकडील मुख्य रस्ताच बंद केल्याने प्रवाशांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रस सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा फटका बसलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाने रस्ता खुला केला.
नायगाव पूव्रेकडील स्थानकात फलाट क्रमांक ४ वर जाण्याचा मुख्य रस्ता हा आम्ही बंद केलेला नाही. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तो बंद करण्यात आला होता. - संतोषकुमार, इन्चार्ज, वसई रेल्वे सुरक्षा बल