ईव्हीएम कारने नेली; अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:04 AM2018-05-30T00:04:43+5:302018-05-30T00:04:43+5:30
मतदाना संपल्यावर मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी निवडणूक विभागाने एसटी बसची स्वतंत्र व्यवस्था केली असताना बोईसर विधानसभा क्षेत्रातील चिंचरे
पालघर/मनोर : मतदाना संपल्यावर मतदान यंत्रे वाहून नेण्यासाठी निवडणूक विभागाने एसटी बसची स्वतंत्र व्यवस्था केली असताना बोईसर विधानसभा क्षेत्रातील चिंचरे (बूथ क्र.१७) येथील मतदान यंत्रे एका कारमधून नेण्याचा गंभीर प्रकार किराटच्या ग्रामस्थांनी रोखला. मतदान केंद्राध्यक्षसह त्यांच्या सहकाºयांचा कुण्या एका पक्षाला लाभ मिळवून देण्याचा हा प्रयत्न होता की अन्य काही हेतू होता? याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी मतदारामधून केली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी निवडणूकीपूर्वी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले कि, पालघर लोकसभा क्षेत्रातील ६ विधानसभा क्षेत्रात एकूण २०९७ मतदान केंद्रांसाठी ३३० बसेस, ३७० जिप आणि ६ बोटी ची व्यवस्था केली आहे. एका झोन निहाय अंतर्भूत मतदान केंद्रातील यंत्रे बंद पेटीत ठेवून त्या सिलबंद करून निवडणूक निर्णय अधिकाºयाने ठरवून दिलेल्या वाहनातून पालघरच्या सूर्या कॉलनी येथील गोदामात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारी वाहनांसह पोलीस अधिक्षकासह ११ अधिकारी ३ हजार २९७ पोलीस कर्मचारी, १ हजार ११७ होमगार्ड इतका मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचेही स्पष्ट केले होते. अशावेळी पालघर तालुक्यातील बूथ क्र. १७ चिंचरे मधील मतपेट्या एका खाजगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरीकांनी समोर आणला. बुथ क्र . १७ चे केंद्राध्यक्ष दिपक खोत यांना मतदान झाल्यावर बसमधून मतपेट्या नेण्याच्या सूचना देण्यात आल्या असताना या दोन्ही अधिकाºयांनी चिंचरे येथुन खासगी वाहन क्र .एम एच ०३, बीएस ०९८० मधून मतपेट्या बेकायदेशीरपणे नेण्याचा प्रयत्न केला. दक्ष नागरीकाच्या ही बाब निदर्शनास आल्या नंतर त्यांनी हे खाजगी वाहन थांबवून जाब विचारला. प्रथम उपस्थित अधिकाºयांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र ग्रामस्थांनी त्यांना रोखीत मनोर पोलिसांना बोलावल्या नंतर संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना तसेच खासगी वाहनाला मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्राध्यक्ष खोत विरोधात मनोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.