अंडीविक्रीस मंदीचे सावट; खप घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:29 AM2018-04-28T02:29:27+5:302018-04-28T02:29:27+5:30
एरवी दररोज सुमारे ४० ते ५० हजार अंड्याचा पुरवठा होणाऱ्या जव्हार तालुक्यात सध्या १० हजार अंड्याचा पुरवठा होत आहे.
जव्हार : दूध आणि अंडी हे पूर्ण अन्न मानले जात असून, गुलाबी थंडीच्या चाहुल लागल्यानंतर महागलेल्या अंड्याना सध्या उन्हाच्या झळा बसल्या आहेत. त्यातच वाढत्या तापमानामुळे अंड्यावर ताव मारण्यात नागरिकांनी हात आवरता घेतला आहे. त्यामुळे खप घसरला असून याचा परिणाम दर पत्रकावर झाला आहे. एरवी दररोज सुमारे ४० ते ५० हजार अंड्याचा पुरवठा होणाऱ्या जव्हार तालुक्यात सध्या १० हजार अंड्याचा पुरवठा होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी स्वस्त होण्याचा कल दरवर्षी पाहायला मिळतो. तोच यंदाही दिसून येत आहे. महाराष्ट्रात हैद्राबाद तसेच आंध्र प्रदेशातील अन्य भागांतून अंडयÞांचा पुरवठा होतो. तेथील तापमान ४५ अंशांच्या वर सरकले की, अंडयÞांचे उत्पादन कमी होण्यास सुरु वात होते. मात्र, त्याच वेळी अंडयÞांची मागणीही कमी झाल्याने पुरवठयÞावर फारसा परिणाम झालेला नाही. उलट मागणी घटल्याने अंडयÞाचा दर नगामागे दीड रु पयांनी कमी झाला आहे. एरवी ५ रु पये ३० पैशांना मिळणारे अंडे आता चार रु पयांच्या दराने विकले जात आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून अंडयÞांचे उत्पादन कमी होते. तसेच मागणीत मोठयÞा प्रमाणात घट होते. ग्राहकांची मागणी कमी होत असल्याने त्याचा परिणाम अंडयÞांच्या पुरवठयÞावर होत असून या काळातील वाढलेल्या उष्म्यामुळे उत्पादन ५० ते ६० टक्क्यांनी घसरते, याचा सर्वाधिक फटका उत्पादकांना बसत असतो असे दिसून येत आहे.