एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर; हायवे हॉस्पिटलचे लाभले सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:54 PM2019-02-10T23:54:54+5:302019-02-10T23:58:05+5:30
सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
वाडा : सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वाड्यातही वाढदिवसानिमित्त मोफत उपचार व आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार (दि. ९) रोजी शिवसेनेचे वाडा तालुका समन्वयक प्रकाश केणे व न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष अभिजीत केणे यांच्या माध्यमातून डॉ. सुराडकर यांच्या हायवे हॉस्पिटलच्या सहकार्याने महात्मा फुले जनयोजने अंतर्गत करण्यात आले होते.
या शिबिराचा तालुका व परिसरातील शेकडो गोरगरीब व गरजू रुग्णांनी लाभ घेतला. मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसाचे विकार, हृदयविकार, पोटाचे विकार, पित्ताशयाचे खडे या सारख्या खर्चिक आजारांची मोफत तपासणी व उपचार या शिबिरात करण्यात आले. या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी हायवे हॉस्पिटलचे डॉ. अनिल चौधरी, डॉ. महेंद्र पवार व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
शिबिरादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे, माजी उपजिल्हा प्रमुख अरुण पाटील, उपतालुका प्रमुख तुषार यादव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, तालुका सचिव निलेश पाटील, नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, शहर प्रमुख नरेश चौधरी, नगरसेवक संदीप गणोरे, नगरसेविका ऊर्मिला पाटील, जागृती काळण, वर्षा गोळे, आदींसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.