लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:54 AM2017-10-27T05:54:48+5:302017-10-27T05:54:51+5:30
वसई : लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणा-या टोळक्यातील लक्ष्मण परमसिंग, चंदन राय, रणजित मिश्रा या तिघांना बुधवारी वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली.
वसई : लोकलमध्ये जागेच्या वादातून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण करणा-या टोळक्यातील लक्ष्मण परमसिंग, चंदन राय, रणजित मिश्रा या तिघांना बुधवारी वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली. अद्याप एक जण फरार आहे.
वसईत राहणारे शेखरन बालन (६१) वैद्यकीय तपासणी करण्यासाठी १३ आॅक्टोबरला मुंबईला निघाले होते. चर्चगेटला जाण्यासाठी गर्दी असल्याने शेखरन वसईहून सकाळी ७.१९ च्या लोकलने विरारला आले. याच लोकलने ते चर्चगेटला जाणार होते. मात्र, लोकल विरारला पोहोचल्यावर चर्चगेटला जाण्यासाठी सात ते आठ जणांचा ग्रुप डब्यात चढला. त्यांनी त्यांना ही जागा आमची असून तुम्ही उठा असे सांगितले. त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या टोळक्याने त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतरही त्यांनी जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे टोळके संतापले होते. नायगाव स्टेशन आल्यावर या टोळक्याने शेखरन यांना पुन्हा उठण्यासाठी सांगितले. पण, त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.