मोखाड्यातील सरपंचपदाची निवडणूक चुरशीची
By admin | Published: May 7, 2016 12:45 AM2016-05-07T00:45:18+5:302016-05-07T00:45:18+5:30
तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत यामध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद व कार्यकर्ते तसेच कुणाचे मतदार हे चित्र स्पष्ट झाले आहे असे असले तरी
मोखाडा : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या आहेत यामध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद व कार्यकर्ते तसेच कुणाचे मतदार हे चित्र स्पष्ट झाले आहे असे असले तरी हा निवडणुकीचा पहिला टप्पा असुन शेवटचा टप्पा सरपंच निवडणुकीत दिसून येईल तसेच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ग्रामपंचायती वर वेगवेगळ्या पक्षाने आपआपला दावा केला आहे.
तालुक्यात २१ ग्रामपंचायती असुन दोन ग्रामपंचायती बिनविरोध तर मोखाडा वासियांनी निवडणूकीवर टाकलेल्या बहिष्कारमुळ उर्विरत १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाहा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर शिवसेना राष्ट्रवादी याना संमिश्र यश मिळाले आहे. अशा परिस्थितीत सरपंच पदाची निवडणूक जुलैमध्ये होणार असल्याने या काळात प्रभोलने, पळवा पळवी असे राजकीय समिकरणे शिजण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे सरपंचपदाची निवडणूक गाजणार हे नक्की. तसेच काही ग्रामपंचायती मध्ये काही पक्षाना आपला सरपंच बसविण्यास एक ते दोन सदस्याची संख्या कमी पडत आहे यामुळे सरपंच निवडणूक पहाणे चुरशीचे ठरणार आहे. (वार्ताहर)