पालघर तालुक्यातील वीजवाहिन्या बदलल्या
By admin | Published: December 21, 2015 11:50 PM2015-12-21T23:50:25+5:302015-12-21T23:50:25+5:30
पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागात येणाऱ्या चार गावात वीजेचे जीर्ण खांब, वाहिन्या बदलून वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता भूमीगत वायर टाकण्यात आली आहे.
मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी भागात येणाऱ्या चार गावात वीजेचे जीर्ण खांब, वाहिन्या बदलून वीजचोरीला आळा घालण्यासाठी आता भूमीगत वायर टाकण्यात आली आहे.
तसेच १४९ नवीन मीटर बसविण्यात महावितरण यशस्वी झाले असून उर्वरित गावातही अशाच प्रकारची कामे सुरू करणार आहेत असे सहायक अभियंता रोहित संखे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून दहिसर, दुर्वेस, हलोली, वाडा खडकोना गावातील व पाड्यात अनेक ठिकाणी जीर्ण वाहिन्या, वीजखांब बदलण्याची मागणीची दखल त्यांनी घेतली. सावरखंड मरावि वीजमंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावामध्ये मोठ्या जोमाने काम सुरू केले आहे.
सध्या चार गावात काम पूर्ण झाले असून उर्वरित गावातील ही समस्या टप्प्याटप्प्याने सोडविली जाईल. तसेच प्रत्येक गावात होणाऱ्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी भूमिगत केबल टाकण्यात येईल जेणेकरून महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही अशाप्रकारे गावे वीजचोरीमुक्त करण्याचे अभियान सुरू केले आहे.