अकरा लाखाची दारू दापचरी नाक्यावर पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:18 AM2017-12-22T02:18:43+5:302017-12-22T02:18:59+5:30
मुंबई अहमदाबाद मार्गावर दापचरी तपासणी नाका येथे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाºयांनी एक कार पकडून अकरा लाखाचे मद्य पकडले आहे.
तलासरी : मुंबई अहमदाबाद मार्गावर दापचरी तपासणी नाका येथे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिका-यांनी एक कार पकडून अकरा लाखाचे मद्य पकडले आहे.
दारूबंदी खात्याचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी नाक्याच्या अधिकारी जे. एस. गोगावले, मासमार, मिसाळ गायकवाड, तसेच कर्मचारी विजय पाटील, समीर भोसले, ज्योतिबा पाटील, यादव यांनी नाका बंदी करून मुंबई कडे जाणाºया या कारची तपासणी केली असता गाडीत हे मद्य सापडले. या वेळी गाडीतील अमर मोहन भोईर रा. डोंबिवली यास अटक करून ११, ४५, ७६६ रु पयाचा मुद्देमाल जप्त केला.
तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दापचरी येथे काही दिवसापूर्वी कोट्यवधी रु पयाचे उच्च प्रतीचे मादकद्रव्य पकडण्यात आले होते. त्यानंतर आता दापचरीतच हे मद्य पकडण्यात आल्याने येथून होणारी मद्य तस्करी उजेडात आली आहे.
तलासरी तालुका हा गुजरात राज्य व केंद्रशासित दादरा नगर हवेलीला लागून आहे. दादरा, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून मोठ्या प्रमाणात दमण दारू महाराष्ट्रात येते. यावर म्हणावी तितकी कारवाई होत नाही तसेच उधवा येथे पोलिसांची चौकी असून सुद्धा तस्करांची टोळी शासकीय यंत्रणेच्या नाकावर टिच्चून या मार्गावरून चोरटी दारू महाराष्ट्रात आणते.