वृक्ष लागवडीच्या नावाखाली उधळपट्टी्
By Admin | Published: January 22, 2016 01:59 AM2016-01-22T01:59:12+5:302016-01-22T01:59:12+5:30
सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली तालुक्यात गत साडेतिन वर्षात ११,३७,०३६ रुपये एवढा कागदोपञी खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आले
नरविंद्र साळवी, मोखाडा
सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली तालुक्यात गत साडेतिन वर्षात ११,३७,०३६ रुपये एवढा कागदोपञी खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आले असले तरी प्रत्यक्षात तसे दिसत नाही. लाखोरुपये खर्च करुन या भागात विविध योजनांच्या माध्यमातून अंदाजे तीन हजारांहून अधिक वृक्ष लागवड झाल्याचे कागदपत्रांवरुन दिसत आहे.
मोखाडा सामाजिक वनीकरण परिक्षत्र कार्यालयाच्या माध्यमातून गावठान, शाळेचे प्रांगण, विहिरी जवळ, ग्रामपंचायत हद्दीत, स्मशानभूमी परिसर, गाव-पाड्यांना अंतर्गत व मुख्य रस्ते आदी ठिकाणी २०० रोपांची लागवड करणे असा नियम आहे. या नियमानुसार मोखाडा तालुक्यांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनां कायद्यान्वये सन २०१२ ते २०१६ या पावसाळा कालावधीत जवळपास ३००० रोपांची लागवड करण्यांत आली. या रोपांमध्ये सावली देणारी व शोभिवंत रोपे ७० टक्के तर फळ झाडे व धार्मिक अशाप्रकारे ३० टक्के वृक्षांची लागवड केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार गत ४ वर्षा च्या कालावधीत ११,३७,०३६ रुपये एवढा खर्च झाल्यांचे दाखवण्यांत आलेले असले तरी प्रत्यक्षात ते काम दिसून येत नाही.च्तर तालुक्यांच्या ठिकाणी असलेले सामाजिक वनिकरण विभागाचे कार्यालय तालुक्यांतील असंख्य जनतेला अजुन ही माहीत नाही यामुळे यामध्ये भर म्हणुण कि काय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न पुढे करुन लागवड अधिकारी आठवड्यातुन तीन ते चार दिवस कार्यालय चालु ठेऊन उर्वरित दिवस कार्यालयाला टाळे ठोकून असतात.
च्यामुळे शासन दरवर्षी वनिकरण विभागा मार्फत वृक्ष लागवडी वर लाखोरुपयांचा खर्च करत असतानाही अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात प्रत्येकक्षात उपलब्ध निधिच्या तरतुदी नुसार विकास झालेला दिसत नाही.