उघडीप मिळाल्याने लागवडीला जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:29 PM2018-07-27T23:29:07+5:302018-07-27T23:29:30+5:30
ठिकठिकाणी बळीराजा शेतात लागवाडीसाठीची जोरदार तयारी करू लागला आहे
- निखील मेस्त्री
पालघर : पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील लागवडीची कामे जोमात सुरु झाली आहे. ठिकठिकाणी बळीराजा शेतात लागवाडीसाठीची जोरदार तयारी करू लागला आहे. २३ जुलैपर्यंत आठ तालुक्यात एकूण ४२ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावर भाताची रोपणी झाली आहे. याची टक्केवारी ५५.७४ टक्के झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यामध्ये सर्वाधिक रोपणी डहाणू तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात ९ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावर रोपणी जहलेली आहे. त्याखालोखाल तलासरी तालुक्यात ६ हजार ६४६ हेक्टर, वाडा तालुक्यात ६ हजार ३७८ हेक्टर, पालघर तालुक्यात ६ हजार ५० हेक्टर, वसई तालुक्यात ५ हजार २४९ हेक्टर, जव्हार तालुक्यात ३ हजार ९५० हेक्टर, विक्र मगड तालुक्यात ३ हजार २१० हेक्टर तर सर्वात कमी रोपणी मोखाडा तालुक्यात असून ती १ हजार ४९० हेक्टर इतकी आहे. भाताच्या बी पेरण्या झाल्यानंतर काही काळाने रोपवाटिका तयार होण्याच्या काळात पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले होते. पावसाचे पाणी या रोपवाटिकांमध्ये साचून राहिल्याने काही ठिकाणी ती रोपे कुजली तर काही ठिकाणी रोपे कमी प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांना पूर्ण रोपणी करू शकणार नसल्याचे दिसते आहे. भातासोबत जिल्ह्यात ३३३३ हेक्टर क्षेत्रावर नागली, २ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर वरई, १ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावर उडीद, ३३ हेक्टर क्षेत्रावर मूग, ८६ हेक्टर क्षेत्रावर चवळी, ३४ हेक्टरवर भुईमूगाची लागवड झाली आहे.
पाच तालुक्यांत नागलीची लागवड चांगली
वसई, पालघर,तलासरी तालुके वगळता इतर पाच तालुक्यात नागलीची लागवड बºयापैकी झालेली आहे. यामध्ये डहाणूत १९ हेक्टर, वाड्यात ७६ हेक्टर, विक्र मगडमध्ये ५५० हेक्टर, जव्हार ८२७ हेक्टर व मोखाडा १ हजार ८६० हेक्टरवर प्रत्यक्ष नागली आहे.
वरई पिकाखाली वाडा तालुक्यात ८१ हेक्टर, विक्र मगड ५६.६० हेक्टर, जव्हार ४२८ हेक्टर तर मोखाडा तालुक्यात १ हजार ७४०
हेक्टर क्षेत्र आहे.
तूर पीकखाली डहाणू तालुका ९५ हे, तलासरी ५३ हे, वाडा ३१५ हे, विक्र मगड १९० हे,जव्हार ६२३ हे तर मोखाडा १०० हेक्टर खाली आहे.
उडीद पिकाखाली डहाणू तालुका ८५ हे, तलासरी १६ हे, वाडा २५६ हे, विक्र मगड १७३ हे, जव्हार ७ हे, मोखाडा तालुका ६०० हेक्टर जमीनीवर लागवड आहे.
मूग पिकाचे क्षेत्र मोखाडा तालुका ३४ हेक्टर असून कुळीथ व चवळी पिकाखालचे क्षेत्र वाडा तालुक्यात ८४ हेक्टर तर तलासरी तालुक्यात २ हेक्टरच आहे.
भुईमूग क्षेत्रात मोखाडा तालुक्यात २७ हेक्टर तर वाडा तालुक्यात ७ हेक्टर इतके आहे.
तीळ पिकाखाली मोखाडा तालुक्यात २६ हेक्टर तर वाडा तालुक्यात २८ हेक्टर क्षेत्र आहे.