विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:45 AM2018-03-10T05:45:01+5:302018-03-10T05:45:01+5:30

विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत.

 Employee, Ganapati, and other four months, including 'Diwali' festival, get 'em' from Vitabhitti | विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

विटभट्टीतून ‘त्यांना’ मिळतोय रोजगार, गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी मिळते उचल

Next

तलवाडा : विटभट्टीचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात केला जातो़ त्यांसाठी हजारो वीटभटटी कामगार-मजुर जिल्हयातील विविध भागातुन येत असतात. सध्यस्थितीमध्ये कामगारांनी (मजूर) वीटभट्टी शेजारीच राहाण्यासाठी बांबूंच्या झोपडया बांधण्यात आल्या आहेत. यांलाच आदिवाासी मजुर भोंगा असेही संबोधतात़ दिवसा विटा बनवून रात्री ते निवारा याच भोंग्यामध्ये करतात.
ठाणे जिल्हा व मुंबई उनगरात दररोज उभ्या राहाणाºया टोलेजंग इमारती व कारखान्यासाठी लाखो विटांची गरज लागते. विक्रमगड तालुक्यातील या भट्टयांवर तयार झालेल्या विटा मोठया प्रमाणात इतर शहरात जात असतात. या विटा बनविण्यासाठी शेकडो मजूर वीटभट्टीच्या ठिकाणी दाखल होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर हा वीट बनविण्याचा कारखाना बंद होतो. ़त्यानंतर तो व्यवसाय दिवाळीनंतर सुरु होतो़ दरम्यान गणपती, दिवाळी सणासहीत इतर चार महिन्यांसाठी लागणाºया खर्चासाठी वीटभटटी मालकांकडून हे कामगार, मजुर आगावू रक्कम उचल म्हणून घेऊन आपली उपजिवीका चालवितात. दिवाळी सरताच ते पुन्हा नव्या जोमाने कुटुंबासह वीटभट्टी मालकांकडे कामासाठी येत असतात़
विक्रमगड तालुक्यातील सवादे, मलवाडा, पोचाडे, आंबेघर, आलोंडे, ओंदे, गडदे अशा विविध गावामध्ये विटा बनविण्याचे काम जोमात सुरु झाले आहे़ त्यामुळे वीटभटटी मालक काम करणाºया मजुरांना अधिक रक्कम खर्चासाठी देऊन बुक करुन ठेवत असतो़
दरम्यान, कुणी वीटभट्टी मजुर कामगांराना जादा मजुरी देऊन पळवू नये यासाठी मालक स्वत:गाडी, ट्क, टेम्पो पाठवून मजुरांना घेऊन येतात़ अशी धावपळ असते.

सवलतींचा भार वाढणार

बहुसंख्य मजुर हे विक्रमगड व तालुक्याच्या बाजुंच्या गावातील व अन्य जवळच्या तालुक्यांतील आदिवासी भागात राहाणारे आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांची वीटभट्टी मजुर कामगारांमध्ये संख्या जास्त आहे. पती, पत्नी,भाऊ असे कामगार एकत्रपणे वीटभटटीवर काम करत असतात़
कामासाठी आलेले हे कामगार थंडी व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून वीटभट्टीजवळ असलेल्या मोकळया जागेचे मैदानात स्वत:बांबु लाऊन आपली झोपडी-घर उभे करुन आठ महिने तेथे राहत असतात़. ते मजुर हे दिवसाला सर्वसाधारणपणे १५०० ते २००० हजार विटा तयार करतात. कच्चा मातीने तयार केलेल्या विटा या लाखोंच्या संख्येने तयार करुन त्या भट्टीवर लाऊन लाल होईपर्यत तयार करुन विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जात असतात़ याकरीता २० ते ३० दिवसांचा अवधी लगत असतो. मेहनतीच्या मानाने त्यांना येथे पुरेशा सुविधा नसतात हे वास्तव आहे.
मजुरांना जेवण -पाण्याची सोय मालक वर्ग योग्यरित्या करीत असल्याने ते आनंदाने त्यांच्याकडे आठ महिने राहतात़ यातुन मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे़ पावसाळयात हे मजुर पुन्हा आपल्या घरी परतुन चार महिने शेतीवाडी करीतात. सणाच्या काळात ते हमखास आपल्या गावी परततात.

Web Title:  Employee, Ganapati, and other four months, including 'Diwali' festival, get 'em' from Vitabhitti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.