लाच घेताना भूमी अभिलेखचे कर्मचारी अटकेत
By admin | Published: June 3, 2016 01:45 AM2016-06-03T01:45:12+5:302016-06-03T01:45:12+5:30
जागा मोजणी अहवाल देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना ठाणे अॅन्टीकरप्शन पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली.
वसई : जागा मोजणी अहवाल देण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना ठाणे अॅन्टीकरप्शन पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केली.
वसई कार्यालयातील सर्व्हेअर दिपेश पिंगळे (२९) आणि निमतनदार समसू पातारा (४०) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदाराने पिंगळे आणि पातारा यांच्याकडे जागा मोजणी अहवालाची प्रत मागितली होती. त्यासाठी पिंगळे आणि पातारा यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रूपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे येथील अॅटीकरप्शन विभागाकडे तक्रार केली होती.
अॅन्टीकरप्शन पथक गेल्या नोव्हेंबरपासून पिंगळे आणि पातारा यांच्या मागावर होते. शेवटी आज संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांच्या पथकाने पिंगळे आणि पातारा यांना दोन लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. (वार्ताहर)