तुळींज पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:59 AM2017-09-18T05:59:25+5:302017-09-18T05:59:28+5:30

मिसिंगची तक्रार नोंदविण्यासाठी तक्रारदाराकडून पेन ड्राइव्ह आणि कागदाची रिम मागणाºया तुळींज पोलीस ठाण्यातील हवालदार योगेश रमेश साळोखे याला पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी निलंबित केले आहे.

The employees of the Tuling police station suspended | तुळींज पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित

तुळींज पोलीस ठाण्यातील कर्मचारी निलंबित

Next

वसई : मिसिंगची तक्रार नोंदविण्यासाठी तक्रारदाराकडून पेन ड्राइव्ह आणि कागदाची रिम मागणाºया तुळींज पोलीस ठाण्यातील हवालदार योगेश रमेश साळोखे याला पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी निलंबित केले आहे.
तो तुळींज पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदारांचा मदतनीस म्हणून काम करतो. त्याने मिसिंगची तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराकडून पेन ड्राइव्ह आणि कागदाची रिम मागितली होती. या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग तक्रारदाराने केले होते. त्यानंतर, पोलीस अधीक्षक सिंगे यांच्याकडे तक्रार केली होती. सिंगे यांनी साळोखे यांना सेवेतून निलंबित करीत असल्याचा आदेश जारी केला आहे. निलंबन काळात साळोखे यांना पालघर जिल्हा नियंत्रण कक्षात दररोज दोन वेळा हजेरी देण्याचे, तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही दिले आहेत.

Web Title: The employees of the Tuling police station suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.