भुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगारभुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगार

By admin | Published: July 7, 2017 05:47 AM2017-07-07T05:47:07+5:302017-07-07T05:47:07+5:30

पावसाळा सुरू झाला म्हणजे गरमा गरम पदार्थांना खवैये पसंती देतात. यामध्ये कोळशावर भाजलेली किंवा उकडलेली स्वीटकॉर्नची

Employment to many landlords who give jobs to many landowners | भुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगारभुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगार

भुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगारभुट्टा देतोय अनेक भूमीपुत्रांना रोजगार

Next

शशीकांत ठाकूर/लोकमत न्यूज नेटवर्क
कासा: पावसाळा सुरू झाला म्हणजे गरमा गरम पदार्थांना खवैये पसंती देतात. यामध्ये कोळशावर भाजलेली किंवा उकडलेली स्वीटकॉर्नची (भुट्टा) मिळाली तर पावसात भिजणाऱ्या तरूणाईचा आनंद व्दिगुणीत होतो त्यामुळे पावसाच्या दिवसात फारसे भांडवल न लागणारा भुट्टा विक्रीचा धंदा अनेक भूमीपुत्रांना चांगला रोजगार मिळवून देतो आहे.
फास्टफूड खाण्यापेक्षा खवैय्ये स्वीट कॉर्नची भाजलेली कणसे खायला आवर्जून येतात. त्यामुळे पाण्याचे धबधबे, बाजारपेठेत, रस्त्यालगत ठेल्यावरून ती विकण्याचा धंदा अनेकजण करतात. पूर्वी उन्हाळयात सरबत, आईस्क्रीम विकणारे विक्रेते पावसाळयात गावी जात असत परंतु हा धंदा तेजीत असल्याने गावी जाण्याऐवजी ते आता हा धंदा करीत आहेत. आता काही स्थानिक तरूणही हा व्यवसाय करतांना दिसत आहे.
स्वीटकॉर्न कणसांच्या नाशिक येथून घेतलेल्या एका गोणीस ३०० ते ४०० रू. पडतात किंवा २० ते २२ रूपये किलो प्रमाणे ती मिळतात. तर कोळासा २५ ते ३० रू. किलो भावाने मिळातो. भाजलेल्या एका कणसाची विक्री १५ ते २० रू. प्रति नग होते.
तसेच ही कणसे लवकर खराब होत नसल्यामुळे एक गोणी कणसे विकल्यावर ३०० ते ४०० रूपये मिळत असल्याचे मका विक्रे ता विजय मौर्या यांने सांगितले.
तसेच एक मका भाजून विकल्यास त्यातून चांगली कमाई होते. असे त्यांनी सांगितले.

यातही आहे व्हेरिएशन

स्वीट कॉर्नची कणसे प्रेशर कुकरमध्ये उकडवून देखील विकली जातात. तर ज्यांना दाताने ओढून ती खाणे आवडत नाही त्यांच्यासाठी सोललेले मक्याचे दाणे उकडवून ते बटर व चाट मसाला, तिखट मीठ लावून दिले जातात.
त्याची किंमतही अर्थातच जास्त असते त्यासाठी भांडवलही थोडे जास्त लागते.

Web Title: Employment to many landlords who give jobs to many landowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.