नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांतून मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:43 AM2018-10-12T00:43:24+5:302018-10-12T00:43:34+5:30

Employment in marathon flower march in Navaratri Festival | नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांतून मिळाला रोजगार

नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांतून मिळाला रोजगार

Next

- अनिरूद्ध पाटील

बोर्डी : नवरात्रोत्सवाकरिता झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. या फुलांची हातोहात विक्री होऊन फुलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शिवाय फुलांच्या माळा बनविणाºयांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
घरोघरातील घट तसेच विविध गरबा आणि दांडिया मंडळांकडून मखर सजावट व पूजेकरिता झेंडूच्या फुलांचा वापर होत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. डहाणू, तलासरी आणि गुजरातच्या उंबरगाव या शहरातील फूल बाजारात स्थानिक फूले उपलब्ध झाल्याने दरही आटोक्यात आहेत. त्यामुळे उत्सवकाळात या फुलांच्या माळा बनवून त्यांची विक्री करणाºयांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. डोअर टू डोअर विक्र ीचा फंडा फुलमाळा विक्र ेत्यांनीही अवलंबिलेला दिसतो.
उत्सवकाळात या फुलांची मागणी लक्षात घेऊन झाई, बोरिगाव येथील कृषीभूषण शेतकरी यज्ञेश सावे यांनी सहा एकरात त्यांची लागवड केली आहे. झेंडूच्या कलकत्ता जम्बो या जातीमध्ये पिवळे आणि लाल हे दोन प्रकार आहेत. तर अष्टगंधा लाल आणि रोगोल्ड पिवळा या जातींची लागवड केली आहे. त्यांनी मे महिन्यात जमिनीची मशागत करून स्वत: नर्सरीत रोपे तयार केली. तर जुलैच्या प्रारंभी एकरी सातहजार प्रमाणे लागवड केली. गणेशोत्सवापासून फुलांची पहिली तोड केली, ती २ टनापर्यंत झाली. तर नवरात्रोत्सव ते दसरा या उत्सव कालावधीत सुमारे १६ टन उत्पादन अपेक्षित असून दिवाळीलाही तेवढेच उत्पन्न मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.
चार महीने या फूलशेतीचा कालावधी असून एका एकरातून ७० ते ७५ हजारांचा निव्वळ नफा त्यांना अपेक्षित आहे.

सध्या फुलांचा प्रतिकिलो भाव ५० ते ६० रुपये आहे. या फुलशेतीतून उत्सवकाळा व्यतिरिक्त १०० किलो प्रतिदिन या प्रमाणे निघणाºया फुलांपासून पत्नी शीतल सावे यांनी माळा बनविण्याचा जोड व्यवसाय सुरू केला आहे. त्याला स्थानिक पातळीवर मोठी मागणी आहे. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.’’
- यज्ञेश सावे, कृषिभूषण (प्रगतिशील शेतकरी, झाई-बोरिगाव)

Web Title: Employment in marathon flower march in Navaratri Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.