मोहाच्या फळांमुळे आदिवासींना रोजगार
By admin | Published: April 9, 2017 12:49 AM2017-04-09T00:49:34+5:302017-04-09T00:49:34+5:30
विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील
विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगले हे औषधी वनस्पती, रानभाज्या यामुळे बऱ्याचदा आदिवासी जनांचा आर्थिक आधार बनतात. सध्या येथील मोहाचे वृक्ष त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत़ याकाळात मोहाच्या वृक्षांना फुले बहरली आहेत़ ही फुले पहाटच्या सुमारास मोठयासंख्येने झाडाखाली पडलेली असल्याने ती वेचण्याचे काम होत असून त्यापासून मुख्यत: दारु होत असल्याने तसेच औषधी म्हणून तिचा उपयोग सर्वश्रुत असल्याने ती नगदी कमाई ठरत आहे.
मोहाचे झाड म्हणजे शेतकरी मजुंराची पडती बाजुच समजली जाते़ ग्रामीण भागात आंब्यांच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो़ मोहाच्या झाडापासून शेतकऱ्याला स्वत:चे उन, वारा, पाऊस यांपासून रक्षण करण्याकरीता लाकूड तर मिळतेच पण पावसाळयात नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या तिव्र उष्णतेने सुकून जातात़ परिणामी वाऱ्यामुळे जमीनीवर पाला-पाचोळा तयार होतो़ व तो या दिवसांत शेतीची राबनी करण्याकरीता वापरला जातो़
मोहाच्या झाडांच्या वाढत्या उपयोगामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते तर महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकलो ७० तेक ८० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते़ तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो़ यामुळे मोहाचे झाड आदिवासी गोरगरिब शेतकरी, मजुरांसाठी जणू फलदायीच बनले आहे़
या झाला पिवळया रंगाची फुले येतात़ उष्णता फळास लागली की, ती फुले खाली पडतात़ ही फुले आदिवासी सकाळ, दुपारपर्यतच्या वेळेत वेचुन उन्हात सुकवतात़ कालातंराने या फुलांस भाव मिळाला तर २० ते ३५ रुपये किलोने विकून गावठी दारु बनविली जाते़ तसेच तिचा औषध म्हणून वापर होत असतो.
फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडें (मोहटया) म्हणुन संबोधतात़ काही वेळेस कवळया दोडयापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहटया तयार केल्या जातात़ त्या सकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो़ तर पिकलेल्या दोंडयामधून पाच ते सहा बिया मिळतात़
आदिवासी दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो़ त्यानंतर त्या बिया फोडल्या असता यामधून दोन दले मिळतात़ त्यास आदिवासी लोक डाळिंब संबोधतात़ ही दले सुकवितात़ दरम्यानच्या मोसमात एक व्यक्ती प्रतिकुंटुंब एक क्विंटलच्या आसपास ही दले तेलाच्या कारखान्यात नेतात़ त्यापासून किमान ५० ते ६० किलो खाद्यतेल मिळते़
फळ एक फायदे अनेक
सुरुवातीला तेलाला तीव्र उष्णतेत कढवावे लागते़ तर कडूपणा काढण्यासाठी त्या तेलात नागलीच्या पिठाची छोटी भाकर टाकली जाते़ परिणामी त्यापासून तेलातील मैला व कडूपणा नष्ट होवुन तेल खाण्यास योग्य होते.
रुग्ण चिकित्सा करतांना या कच्चा तेलाचा उपयोग होत असून थंडी ताप आल्यास कपाळावर रुमाल भिजवून ठेवला असाता आरोम मिळतो अशी मान्यता आहे.
शिवाय, यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते़ फळ फोडल्यानंतरही टरफले शेतात टाकली जातात़ पाऊस पडल्यानंतर ही टरफले जमीनीत कुजली जातात़ त्यातून खतनिर्मीती होऊन पिकेही भरभरुन येत असतात़