झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:30 AM2018-10-03T05:30:01+5:302018-10-03T05:30:16+5:30

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था : शाश्वत, सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन

Empower farmers' rally at Jhadpoli | झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

googlenewsNext

विक्रमगड : भावनादेवी भगवान सांबरे स्कूल झडपोली, विक्र मगड येथे भव्य शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्याला पालघर-ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५५०० हून अधिक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थिती होते . या शेतकरी मेळाव्यात यौगिक सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच शेतीवर अवलंबून उद्योग शेतकऱ्यांना केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

शाश्वत शेती व गट समूह शेती या भागात करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ग्रामीण भागात लघु उद्योगमुळे रोजगार निर्मिती होणार आहे यासाठी शेतीतून एक ब्रँड तयार करा तरच मार्केट उपलब्ध होईल. आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात आहे त्यामुळे चविष्ट अन्न मिळत नसून आपले आरोग्य व जमिनीचे आरोग्य बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे या साठी सेंद्रिय खताने शेती करण्याची गरज असल्याची माहिती गोवर्धन इको व्हिलेज चे प्रभु मदनमोहन दास यांना दिली भारत शेती प्रधान देश आहे त्यामुळे शेती करणे आवश्यक आहे व शेती करतांनाही शाश्वत शेती करून उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करा असे प्रतिपादन या मेळाव्यात करण्यात आले. तसेच शेतीला पूरक व्यवसाय होणे गरजेचे आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले व तिला पूरक उद्योगाची जोड दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. या दृष्टीकोनातून शेतकºयांनी या पुरक उद्योगांकडे बघावे अशी सूचना करण्यात आली या मेळाव्यात शेतकी गृहोद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्र मास प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी पालघर), मिलींद बोरीकर (मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर), काशीनाथ तरकसे (जिल्हा कृषी अधिक्षक पालघर), प्रशांत कांबळे (उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन पालघर), डॉ अजित हिरवे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), ब्रम्हकुमार राजूभाईजी (राष्टÑीय संयोजक ग्रामविकास प्रभाग, माऊंट अबू, राजस्थान) मदनमोहन दास (ग्रामीण विकास प्रमुख गोवर्धन इको व्हिलेज गालतरे) डॉ सनतकुमार दास प्रभुजी (अध्यक्ष गोवर्धन इको व्हिलेज गालतरे), डॉ हेमंत सवरा, मधुकर खुताडे (सभापती) तसेंच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात बोलतांनाजिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी शेतकाºयांसाठीच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन दिल तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर मिलिंद बोरीकर यांनी शेतकºयांना शेती व तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली.

दोन्ही मान्यवरांनी जिजाऊ शैक्षणकि व सामाजिक संस्था संस्थापक निलेशजी भगवान सांबरे राबवत असलेल्या सामाजिक उपक्र मांच कौतुक करून पुढील कार्यात जिल्हा प्रशासन या सामाजिक कार्यात सर्व सहकार्य करेल अस आश्वासन दिलं.
 

Web Title: Empower farmers' rally at Jhadpoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.