आगाशीमध्ये मंदिराच्या वतनजमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:49 AM2018-04-22T04:49:55+5:302018-04-22T04:49:55+5:30
माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती.
सुनिल घरत।
पारोळ : जमिन आणि चाळ माफियांमुळे वसई तालुका चर्चेत असतांना आगाशीतील पुरातन मंदिराच्या पेशवेकालीन इनाम जागेमध्ये अतिक्रमण झाल्याने भक्तांमध्ये संतापाची भावना आहे. विशेष म्हणजे या षडयंत्रामध्ये विश्वस्त मंडळातील काहींची साथ असल्याची चर्चा असून गावकऱ्यांमधील अज्ञानाचा ते फायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
माधवराव पेशव्यांच्या कार्यकाळात या मंदीराच्या मागील सुमारे चौºयाण्णव गुंठे म्हणजे सव्वा दोन एकर जमिन देवस्थान मंदिराला इनाम वतन म्हणून प्राप्त झाली होती. या जमिनीच्या उत्पन्नातून मंदिराची पूजा अर्चना, दिवा बत्ती, डागडूजी व जिर्णोध्दार इत्यादी खर्च त्यातून व्हावा असा तत्कालीन मराठेशाहीचा आदेश होता.
मराठेशाही आणि नंतर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळापासून चालत आलेले हे इनाम वतन स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारने कायम ठेवले आणि ब्रिटिशांनी दिलेला क्लास-थ्री इनाम वतन हा दर्जा देखिल कायम ठेवण्यात आला होता. या मंदीराला इनाम वतन मिळालेली जमिन हडप करायची प्रयत्न फार पूर्वी पासून सूरू होते. मात्र, इनाम वतन जागेत वहिवाटदार हा कधीच भोगवटादार म्हणजे मालक होऊ शकत नसल्याने हे सगळे प्रयत्न वाया गेले.
मात्र, आता मंदीरच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदेशीर अतिक्र मण करून पक्क्या घराचे व कंपाऊंड वॉलचे बांधकाम करण्यात आले आहे. इनाम वतन जागेची विक्र ी अथवा वाटणी करता येत नाही असा कायदा असताना या जमिनीचा अपहारसाठी सुत्रबध्द पावले टाकली जात आहेत.
भूमाफियांना विश्वस्तांची साथ : या सर्व षडयंत्रात विश्वस्त मंडळातील काही तथाकथित प्रतिष्ठीतांची साथ असल्यामुळे अतिक्र मण करणाºयांचे चांगलेच फावले आहे. चक्रेश्वर तलावाशेजारचे अवैध बांधकाम तोडण्यासाठी सरसावलेली महानगरपालिका या प्रकरणात गप्प का असा सवाल करत भवानी शंकर मंदिराच्या जागेत अवैध बांधकामावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी आगाशी ग्रामस्थ करीत आहेत.