महापालिका भूखंडांवर अतिक्रमणे, ९०.६७ भूखंड टक्के माफियांच्या घशात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:07 AM2019-05-29T01:07:29+5:302019-05-29T01:07:33+5:30

शेकडो आरक्षित जमिनीवर बेसुमार अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे महापालिकेला आता स्वत:च्या विविध विकास कामांसाठी जागेची उणीव भासू लागली आहे.

Encroachment on municipal plots, 9 0.67% of plots per hit by the mafia | महापालिका भूखंडांवर अतिक्रमणे, ९०.६७ भूखंड टक्के माफियांच्या घशात

महापालिका भूखंडांवर अतिक्रमणे, ९०.६७ भूखंड टक्के माफियांच्या घशात

Next

- आशिष राणे

वसई : शेकडो आरक्षित जमिनीवर बेसुमार अतिक्रमणे उभी राहिल्यामुळे महापालिकेला आता स्वत:च्या विविध विकास कामांसाठी जागेची उणीव भासू लागली आहे. मुळातच या सर्व आरक्षित जागांवर अनेक इमारती उभ्या राहिल्याने तेथील रहिवाशांना आता ऐनवेळी बेघर कसे करावयाचे असा मोठा यक्ष प्रश्न महापालिकेपुढे निर्माण झाला आहे. महापालिका हद्दीत व त्या-त्या प्रभागाच्या भागातील विकासकामांसाठी आरक्षित असलेले वसई-विरार शहरांतील भूखंड आजही ओसाड पडलेले आहेत. तर यातील अनेक भूखंड अनधिकृत इमारतींनी गिळंकृत केलेले असून अद्याप अनेक आरक्षित भूखंड मोकळे असल्याने त्यावर भूमाफियांची नजर आहे. किंबहुना, असे आरक्षित भूखंड महापालिकेकेडे विकास कामांसाठी हस्तांतरित केले जाण्याचे नोंदणी दस्त अथवा आश्वासन देऊनही कागदोपत्री झाले असले तरी अद्याप ते प्रत्यक्षात हस्तांतरित झालेले नाहीत. शहरात अनेक ठिकाणी एकापाठोपाठ एक वनजमिनी, शासकीय जमिनी गिळंकृत करून त्यावर बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत. असे असतांना विकास कामांसाठी आरक्षित केलेल्या अनेक जागा आज अनधिकृत बांधकांसाठी गिळंकृत करण्यात आल्या आहेत.
।धूळ खात पडलेले महापालिकेचे भूखंड ! : राखीव भूखंडाची माहिती देणारे फलक सध्या प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर धूळ खात पडले असून महापालिकेने आधीच हे भूखंड ताब्यात घेतले असते तर यावर अतिक्रमण झाले नसते. महापालिकेने या राखीव जागांच्या भूखंडांवर झालेल्या अतिक्र मणांवर बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार त्यांनी महापालिकेकडे आहे. याबाबत आयुक्तांची प्रतिक्रिया मिळाली नाही.
।माहिती अधिकारात झाला मोठा खुलासा !
त्यामुळे शहरातील आरक्षित जागा नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून भाजपाच्या राकेश सिंग यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक राखीव जागांवर बेसुमार अतिक्र मणे झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. यामध्ये महापालिकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सर्वाधिक ९०.६७ टक्के अतिक्रमणे ब प्रभागामध्ये झाली असून, सर्वांत कमी २९.८९ टक्के अतिक्र मणे क प्रभाग समितीमध्ये झाली आहेत तर हे भूखंड शाळा, मैदाने, उद्याने, पोलिस ठाणे, क्षेपणभूमी, बफर झोन आदी कामांसाठी हे पूर्वीच आरक्षित करण्यात आले होते.
।राखीव भूखंडांवर झालेली आतापर्यंतची अतिक्रमणे
प्रभाग क्र मांक टक्केवारी
प्रभाग ए ३०.८९ टक्के
प्रभाग बी ९०.६७ टक्के
प्रभाग सी २९.८९ टक्के
प्रभाग डी ८७.९६ टक्के
प्रभाग ई ६५.९६ टक्के
प्रभाग एफ ८७.५ टक्के
प्रभाग जी ४६.४७ टक्के
प्रभाग एच ६२.७२ टक्के
प्रभाग आय ३५.७९ टक्के

Web Title: Encroachment on municipal plots, 9 0.67% of plots per hit by the mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.