खाजगी जागेतील अतिक्रमणावरून पालिका वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:35 AM2019-12-03T02:35:34+5:302019-12-03T02:35:44+5:30

चाळीसहून अधिक सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटाव पथकाने खाजगी जागेतील दोन लोखंडी ते उखडून आणले.

From encroachment to private space to municipal dispute | खाजगी जागेतील अतिक्रमणावरून पालिका वादाच्या भोवऱ्यात

खाजगी जागेतील अतिक्रमणावरून पालिका वादाच्या भोवऱ्यात

Next

- आशिष राणे

वसई : विरार शहर महापालिकेच्या वसई विभागीय आय प्रभाग अंतर्गत नायगाव पापडी रस्त्यावरील सावेवाडीत राहणारे अजय पाटील कुटुंबीयांच्या खाजगी जागेतील अतिक्रमण पालिकेच्या अतिक्र मण हटाव विभागाने कोणतीही नोटीस न बजावता २५ नोव्हेंबर रोजी हटवली. चाळीसहून अधिक सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटाव पथकाने खाजगी जागेतील दोन लोखंडी ते उखडून आणले. आपल्या कुटुंबातील दोघा व्यक्तींना या पथकाने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोपही अजय पाटील यांनी केला. त्यांनी याप्रकरणी महापालिका आयुक्त बी. जी. पवार आणि वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्याकडे तक्रार दिली.
अजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवली सावेवाडीजवळ पापडी नायगाव रस्त्यावर सहवास नावाचे स्वत:चे घर व जमीन आहे. काही सामायिक जमिनीबाबत त्यांच्या दोन कुटुंबांमध्ये जुने वाद आहेत. अजय पाटील यांच्या घराला पुर्वीच्या ग्रामपंचायतीची परवानगी होती. मात्र मधल्या काळात त्यांनी बांधलेल्या संरक्षक भिंतीबाबत तक्रार होऊन वाद निर्माण झाला. फेब्रुवारी २०१९ मध्ये महापालिकेने एमआरटीपीची नोटीस बजावून ही संरक्षक भिंत तोडली. या खाजगी जागेमध्ये रस्ता विकिसत करण्यासाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुरु केली.
दरम्यान, २५ नोव्हेंबरला आय प्रभाग समितीचे प्रभारी सहायक आयुक्त गिलसन घोन्सालवीस यांच्या तोंडी आदेशाने अतिक्रमण हटाव विभागाने पाटील यांच्या घरावर धडक दिली. या कारवाईवर पाटील कुटुंबीयांनी हरकत घेतली असता, या गोंधळात माझी पत्नी, वहिनी व भावासह मलाही दुखापत झाल्याचा आरोप अजय पाटील यांनी केला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. या कारवाईची माहिती महापौर, आयुक्त यांना नव्हती.

अजय पाटील यांचा कौटुंबिक व सामायिक जागेचा वाद आहे. यासंदर्भात मागे त्यांना पालिकेनं नोटिसही बजावली होती. आता पुन्हा अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली असेल, तर मी माहिती घेतो. चुकीच्या प्रकाराचे समर्थन मी करणार नाही. असे पुन्हा घडणार नाही, असे मी पाटील यांना आश्वासित केले आहे. वास्तविक सहायक आयुक्तांनी कारवाई करण्याअगोदर पत्रव्यवहार केला असता, तर हा प्रकार घडला नसता. या प्रकाराची माहिती घेऊन संबंधितांना प्रशासनाद्वारे योग्य निर्देश व संदेशही दिले जातील.
- प्रवीण शेट्टी, महापौर

अजय पाटील यांच्या खाजगी जागेत कारवाई करण्याचे आदेश मीच दिले होते. नोटीसची आवश्यकता नाही. यापूर्वी कारवाई केली आहे. कारवाई करताना आमच्या कर्मचाºयावर पाटील कुटुंबीयांनी हात उचलला. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून त्यातील दोघांना आम्ही वसई पोलिस ठाण्यात घेऊन आलो. यासंदर्भात आम्ही गुन्हाही दाखल करणार होतो. मात्र एक मोबाईल आला आणि त्यांनी आम्ही आपसात मिटवतो, असे सांगितल्यावर आम्ही तक्र ार न नोंदवताच पोलीस ठाण्यातून बाहेर पडलो.
- गिलसन घोन्सालवीस, प्रभारी सहा. आयुक्त वसई ‘आय’ प्रभाग समिती, वसई - विरार मनपा

वसई पोलीस ठाण्यात अजय पाटील यांनी सविस्तर तक्रार दिली आहे. वसई आय प्रभागाच्या अतिक्र मण हटाव विभागाचे अधिकारी दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन आले होते. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते आर्जव करू लागले. पोलिसांनी चौकशी केली असता, पालिकेचे अधिकारी कारवाईसंदर्भातील अधिकृत कागदपत्रे, आगाऊ नोटीस सादर करु शकले नाही. त्यामुळे त्या सर्वांना मी पोलीस ठाण्यातून जाण्यास सांगितले. तरीही घडल्या प्रकाराची मी जातीने चौकशी करून सर्वांना बोलावून घेतो. - भास्कर पुकळे, पोलीस निरीक्षक, वसई

आमचा जुना वाद आहे. याअगोदर पालिकेने नोटीस बजावून कारवाई केली आहे. त्याला मी लेखी उत्तरही दिले आहे. त्यांनतर पालिकेने पुढे काहीही केले नाही. मात्र मधल्या काळात भिंत तोडली. नंतर मलबा जप्त केला. आता जबरदस्तीने माझ्या खाजगी जागेत घुसून, विनापरवानगी व नोटीस न देता लोखंडी गेट नेणे, माझ्या मुलाला व भावास जबरदस्तीने डांबणे आदी गंभीर कृत्य करुन पालिकेला नेमकं काय साध्य करायचे आहे? महापालिका अधिकारी या प्रकारात अगदी सुपारी घेतल्यासारखे वागत आहेत. घडल्या प्रकाराने मी व माझे कुटुंबीय हवालिदल झाले आहे.
- अजय गोविंद पाटील, तक्र ारदार

Web Title: From encroachment to private space to municipal dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.