झडपोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जानेवारीअखेर ६ शिक्षक भरणार

By Admin | Published: December 22, 2016 05:32 AM2016-12-22T05:32:13+5:302016-12-22T05:32:13+5:30

: झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सहा प्राध्यापकांची पदे जानेवारी अखेरपूर्वी भरली जातील असे लेखी आश्वासन

By the end of January, 6 teachers will be felicitated at Government Polytechnic in Jhadoli | झडपोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जानेवारीअखेर ६ शिक्षक भरणार

झडपोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये जानेवारीअखेर ६ शिक्षक भरणार

googlenewsNext

विक्रमगड : झडपोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सहा प्राध्यापकांची पदे जानेवारी अखेरपूर्वी भरली जातील असे लेखी आश्वासन तंत्रशिक्षण सहसंचालकांनी दिल्यामुळे बुधवारी या मागणीसाठी येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात सापडलेले असून त्यामुळे येथे वेगवेगळया प्रकारचे व्यवसायिक शिक्षण घेणा-या ७५० विदयार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून एकूण ४८ कर्मचारी व अधिकारीवर्गाची आवश्यकता असतांना फक्त १६ कर्मचारी कार्यरत आहेत़ येथील विदयार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून सामजिक कार्यकर्ते निलेश सांबरेंसह सरपंच सोनीबाई जाधव, प्रदिप भोईर,आकाश चौधरी, उपसरपंच विजय पाटील, अशोक भोरे आदींसह तहसिलदार कार्यालयासमोर उपोषणास बसले होते़
याची दखल घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सह संचालक प्रमोद नाईक यांनी धाव घेतली व उपोषणकर्त्यांंशी केलेल्या चर्चेअंती जानेवारीपर्यंत ६ प्राध्यापक नियुक्त केले जातील असे लेखी आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई येथे प्रतिनियुक्ती असलेले विद्युत शाखेचे अधिव्याख्याता खडसे यांची प्रतीनियुक्ती रद्द करण्यात येऊन त्यांना तत्काळ या तंत्रनिकेतनमध्ये रुजू होण्याबाबत कळविण्यात आले आहे़ तसेच पाच विद्या शाखेच्या प्राध्यापकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनास प्राधान्याने सादर करुन जानेवारी २०१७ अखेरपर्यत त्यांची नियुक्ती केली जाईल, असेही म्हटले आहे. दरम्यान उर्वरीत रिक्त पदांवर अध्यापकाच्या मे/जून २०१७ मधील नियतकालिन बदल्यांमध्ये बदल्या प्रस्तावित करुन ही पदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यांत येईल व त्याबाबतचा आवश्यक पाठपुरावा संचालनालयामार्फत करण्यांत येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर निलेश सांबरेसहीत सर्वांनी उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार सुरेश सोनवणे म्हणाले की, माझ्या येथील अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी प्रथमच असे विदयार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याकरीता झालेले उपोषण पहातो आहे़ उपोषणाला कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळकृष्ण पुर्णेकर, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा, कॉग्रेसचे नितीन वाडेकर आदींनी पाठिंबा दिला व उपोषण सोडतेवेळी ते े व्यासपिठावरही उपस्थित होते़

Web Title: By the end of January, 6 teachers will be felicitated at Government Polytechnic in Jhadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.