भुयारी मार्गात अखेर सीसीटव्ही कॅमेरे लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:24 PM2018-02-09T13:24:41+5:302018-02-09T13:24:56+5:30
भार्इंदर पुर्व पश्चिम जोडणारया शहिद भगतसिंह भुयारी मार्गात अखेर पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
मीरारोड - भार्इंदर पुर्व पश्चिम जोडणारया शहिद भगतसिंह भुयारी मार्गात अखेर पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आमदार बच्चु कडु यांनी शाळकरी मुलीवर झालेल्या चाकू हल्लया नंतर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती.
भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पुढिल भागात पुर्व - पश्चिम जोडणारया पालिकेच्या भुयारी मार्गातुन हलकी - लहान वाहनं ये जा करतात. सदर मार्ग केवळ वाहनां साठी असला तरी नागरीक देखील येण्या जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करतात.
भुयारी मार्गात दुचाकी स्वार भरधाव वाहन चालवत शर्यत लावतात. तर सकाळच्या सुमारास आपल्या आई सोबत शाळेत जाणारया एका शाळकरी मुली वर माथेफिरुने चाकू हल्ला केला होता.
या प्रकरणी आमदार बच्चु कडु यांनी तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पत्र देऊन तत्काळ भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. पालिकेच्या सिस्टीम मॅनेजर मनस्वी म्हात्रे यांनी कडु यांना पत्र देऊन सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही सुरु असल्याचे कळवले होते. पालिकेने आता भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.