जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 02:40 AM2018-11-04T02:40:52+5:302018-11-04T02:41:34+5:30

महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे.

Ensure the implementation of the Jawhar Nalpani scheme, the Chief Minister has given assurances given | जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

जव्हारची नळपाणी योजना मंजूर, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन केले पूर्ण

Next

जव्हार - महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. खडखड धरणातून राखीव पाणी क्षेत्रातून नवीन नळपाणी योजना प्रस्ताव मागील काही वर्षापासुन नगर परिषदे मार्फत मंत्रालयात दाखल करण्यात आले होते, या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.
जव्हार नगरपरिषदले १ सप्टेंबर २०१८ रोजी १०० वर्ष पुर्ण झाले म्हणून, दि. १ ते ६ सप्टेंबर पर्यत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी जव्हारच्या नवीन नळपाणी योजना व शहराची हद्दवाढ व इतर विकासात्मक योजनेचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी फडणवीस यांनी सभामंडपातच नळपाणी योजना मंजुर करतो अशी घोषणा केली होती. अखेर त्यांनी १६ कोटी ७० लाख रुपयांची ही योजना मंजूर करून तसे प्रशासकीय आदेश संबधीत विभागांना दिले आहेत.
शहराचे विस्तारीकरण व जुनी नळपाणी योजना असल्यामुळे बहुताश भागात पाणी टंचाईची परिस्थिती आहे,. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता नगर परिषदेने तालुक्यातील खडखड धरणातून आरक्षित पाणी साठ्याचे शहरासाठी नवीन नळपाणी योजनेचा १८ कोटींचा प्रस्ताव गेल्या काही वर्षापासुन मंत्रालयात मंजूरी करीता पाठविल होता. मात्र याचा पाठपुरावा नगराध्यक्ष पटेल, उपनगराध्यक्ष पद्मा रजपूत, विरोधीपक्ष नेते दिपक कांगणे, कृणाल उदावंत तसेच इतर सर्व नगरसेवकांनी केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जव्हारकरांचा महत्वाचे पाणी प्रश्न मार्गी लागले आहे. यामुळे जव्हार भागामध्ये दिवाळी आधीच दिवाळसणाचा आनंत असून अनेकांचे पाण्यासे स्वप्न पुर्ण होणार आहे.

मंजूर निधीचा तपशील

राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किमतीच्या ९० टक्के) - १५ कोटी ३ लाख, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहग (प्रकल्प किमतीच्या १० टक्के )- १ कोटी ६७ लाख
श्रीमंत यशवंतराव महाराजांनी पाणी पुरवठा योजना संस्थानाच्या निधीतून पुर्ण करून जव्हार वासीयांना जयसागर डॅम बांधून दिली आहे.

राज्यात मालकीच्या धरणातून पाणी पुरवठा योजना असणारी एकमेव नगर परिषद आहे. त्यावेळेस राजेंनी जवळ जवळ २००० ते २५०० लोकसंख्या असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करून डॅम तयार केला होता. तो आजतागायात जवळ जवळ २५ हजार लोकसंख्या असलेल्या जव्हारकरांची तहान भागवित आहे.

Web Title: Ensure the implementation of the Jawhar Nalpani scheme, the Chief Minister has given assurances given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.